OMG : चपराक मारून महिला वाढवतात चेहऱ्याचं सौंदर्य

जगभरात सौंदर्य वाढवण्याच्या अनेक टिप्स वापरल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, सौंदर्य वाढवण्यासाठी एक अतिशय विचित्र थेरपी जगात वापरली आहे. या थेरेपीमध्ये थप्पड मारून लोकांचं सौंदर्य वाढवलं ​​जातं. याला दक्षिण कोरियामध्ये स्लॅप थेरपी असं म्हणतात. हे दक्षिण कोरियामध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं.

Updated: Dec 2, 2021, 03:06 PM IST
OMG : चपराक मारून महिला वाढवतात चेहऱ्याचं सौंदर्य title=

मुंबई : जगभरात सौंदर्य वाढवण्याच्या अनेक टिप्स वापरल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, सौंदर्य वाढवण्यासाठी एक अतिशय विचित्र थेरपी जगात वापरली आहे. या थेरेपीमध्ये थप्पड मारून लोकांचं सौंदर्य वाढवलं ​​जातं. याला दक्षिण कोरियामध्ये स्लॅप थेरपी असं म्हणतात. हे दक्षिण कोरियामध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं.

दक्षिण कोरियातील महिला शेकडो वर्षांपासून स्लीप थेरपी वापरली जाते. यामध्ये महिला त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी दररोज गालावर 50 चापट मारतात. असं मानलं जातं की, या थेरपीमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. यामुळे महिला पूर्वीपेक्षा अधिक सुंदर बनतात, असं मानलं जातं.

साऊथ कोरियामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित

स्लॅप थेरपीचा अर्थ असा नाही की, जोरात गालावर मारायचं असतं. या थेरेपीमध्ये गालावर अतिशय आरामात आणि हलक्या हातांनी मारलं जातं. महिला स्वतःच्या हातांनी ही थेरपी वापरू शकतात. 

समजून घ्या की, तुम्हाला तुमच्या दोन्ही गालांवर हाताने थोपटलं पाहिजे. जरी ही थेरपी दक्षिण कोरियामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. परंतु हळूहळू ही थेरपी जगभर पसरत आहे.

पुरुषही करतात या थेरेपीचा वापर

लहान वयातच कोरियामध्ये महिला या थेरेपीचा वापर करतात. महिलांशिवाय दक्षिण आफ्रिकेतील पुरुषही ही थेरपी वापरतात. कोरियातील लोकांचा असा विश्वास आहे की, या थेरपीचा योग्य वापर केल्यास त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवता येते. या कारणास्तव याला 'अँटी-एजिंग थेरपी' असंही म्हणतात.