स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!

smartphone flash : कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाही, पण एका आईने चक्क स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या पोटच्या बाळाचा जीव वाचवला. स्मार्टफोनमुळे आईला कॅन्सरवर निदान करणं शक्य झालं आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 4, 2024, 05:24 PM IST
स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान! title=

What does eye cancer look like in babies: कॅन्सर हा आजर इतका गंभीर आहे की त्याचे वेळीच उपचार झाले तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाहीत. कॅन्सरवर उशीरा निदान झाल्यानंतर अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र इंग्लंडमधील एका महिलेने वेळीच आपल्या मुलावर वेळीच कॅन्सरवर निदान केल्यामुळे 3 महिन्यांच्या बाळाचा जीव वाचू शकला आहे. 3 महिन्याच्या बाळाला कॅन्सर झालं आहे हे केवळ मोबाईल फ्लॅश लाइटवरुन समजलं. 

इंग्लंडमधील गिलिंगहॅम केंट येथे राहणाऱ्या सारा हेजेस या महिलेला 2022 मध्ये स्वयंपाकघरात काही काम करत असताना तीच तिच्या तीन महिन्यांचा बाळाकडे लक्ष गेलं. थॉमस नावाच्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी चमकल्याचं तिला वाटत होतं. यानंतर तिने मोबाईलमधील फ्लॅशच्या मदतीने मुलाच्या डोळ्यांची तपासणी केली आणि काही फोटोदेखील घेतले. यानंतर साराने इंटरनेटवर सर्च करून याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. 

साराने भरपूर संशोधन केल्यानंतर तिला समजलं की हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. याची खात्री करुन घेण्यासाठी ती थॉमसला घेऊन डॉक्टरांकडे गेली. यावेळी थॉमसला खरोखरच दुर्मिळ कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झालं. यानंतर तिच्या मुलाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. थॉमसच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले. डोळ्यांच्या कॅन्सरचा हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून त्याचा प्रसार झपाट्याने होतो. केमोथेरपीच्या अनेक फेऱ्यांनंतर थॉमस आता बरा आहे. त्याच्या आईने सुरुवातीला तत्परता दाखवली. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर उपचार पूर्ण झाले.

केमोथेरपी यशस्वी

डॉक्टरांनी थॉमसला ताबडतोब मेडवे हॉस्पिटल या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले. येथे थॉमसवर उपचार करण्यात आले. 2023 मध्ये, थॉमाचीची केमोथेरपी यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि ती खूप सुरक्षित आहे. कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यास उपचार शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.