'Sex ला नकार देणाऱ्या महिलांना मारहाण योग्यच'; पाहा कोण म्हणतंय असं?

सेक्सला नकार दिल्यानंतरही महिलांना मारहाण करण्याच्या बाजूने महिलाच सर्वाधिक असल्याचं दिसून आलं.

Updated: Jun 8, 2022, 09:57 AM IST
'Sex ला नकार देणाऱ्या महिलांना मारहाण योग्यच'; पाहा कोण म्हणतंय असं? title=

मुंबई : नुकतंच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एनएफएचएसच्या सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, देशातील 45% स्त्रिया असं मानतात की, पत्नीने आपली कर्तव्यं नीट पार पाडली नाहीत तर कौटुंबिक हिंसाचार हा त्यांच्यासाठी वैध आहे. तर 44% पुरुषांनी याला सहमती दर्शवली. सेक्सला नकार दिल्यानंतरही महिलांना मारहाण करण्याच्या बाजूने महिलाच सर्वाधिक असल्याचं दिसून आलं.

NFHS ने नुकतेच देशातील महिलांच्या घरगुती स्थितीची माहिती घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं गेलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 45% स्त्रिया मानतात की, बायकोने तिचं कर्तव्य योग्यरित्या पार पाडलं नाही तर शारीरिक छळ किंवा घरगुती अत्याचार करणं ठीक आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे यातील बहुतांश महिला कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात याला सहमती दर्शविणाऱ्या महिलांची टक्केवारी 76.9 आहे. तर इथल्या पुरुषांची टक्केवारी 81.9 इतकी आहे. 

भारतातील प्रत्येक राज्यातील लोकसंख्या, आरोग्य आणि पोषण मानकांवरील आकडेवारीनुसार, बहुतेक लोकांनी त्यांचं मत दिलं की, जर बायका न सांगता बाहेर गेल्या, नीट स्वयंपाक करत नसल्या किंवा पती त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेत असेल तर त्यांना मारहाण करण्यास हरकत नाही.

या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेल्या 11 टक्के महिलांनी सांगितलं की, जर त्यांच्या पत्नींनी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर त्यांचा शारीरिक छळ योग्य आहे. तर केवळ 9.7 टक्के पुरुषांनी याला सहमती दर्शवली. 32 टक्के स्त्रिया, तर 31 टक्के पुरुषांचा असा विश्वास होता की, सासरच्या लोकांचा अनादर केला तरी पत्नीला मारहाण करणं योग्य आहे.