नागरिकांना योगाचं महत्त्व आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र योगा दिन साजरा करण्यासाठी 21 जून या तारखेची निवड का केली याचा कधी विचार केला आहेक का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ. पण त्याआधी यंदाचा योग दिन हा 7th वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघात केलं होतं. संयुक्त राष्ट्र संघात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर केवळ 90 दिवसांच्या आत 193 देशांपैकी 177 देशांनी 11 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण बहुमताने त्याचं समर्थन केलं.
संयुक्त राष्ट्राने यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 ची थीम 'आरोग्यासाठी योग' (Yoga for Well Being)अशी आहे. सध्या कोरोनामुळे आरोग्य धोक्यात आलं आहे. म्हणूनच यावर्षीसुद्धा घरी राहून योगाभ्यास करून आरोग्य जपण्यासाठी जनजागृती केली जातेय.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 च्या निमित्ताने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने एक जिंगल स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतं बक्षीस रक्कम 25 हजार रोख ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 21 जून आहे.
सहभागी होण्यासाठी, आपल्याला भारतीय संविधानातील आठव्या वेळापत्रकात परिभाषित केलेल्या अधिकृत भारतीय भाषांपैकी एका जागतिक योग दिनाचा प्रचार करणार्या 25-30 सेकंदाचं गाणं तयार करावं लागेल. नंतर ते साउंडक्लॉड, गूगल ड्राईव्हवर शेअर करावं किंवा अपलोड करावं लागेल. अधिक माहितीसाठी MyGov वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता.