मुंबई : देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. मात्र सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं दिसून येतंय. रूग्णसंख्येत होणारी घट पाहता अनेक राज्यांना आता हळूहळू अनलॉक करण्यासही सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकं घरी असल्याने अनेकजणांनी खासकरून पुरुषांनी दाढी न करता बिअर्डमॅन व्हायचं ठरवलं. तुम्हीही लॉकडाऊनच्या काळात दाढी वाढवली असेल तर मग आता सावधान व्हा...
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, दाढी वाढवलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो. जाणून घेऊया याबाबत डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे..
एम रोसी अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्माटोलॉजीचे डॉ. अँथनी यांच्या याबाबत बोलताना म्हणाले, "जर तुमची दाढी मोठी असेल तर मास्क तुमच्या तोंडावर त्याचप्रमाणे जबड्यावर योग्यरित्या बसणार नाही. अशावेळी मास्क लावल्यानंतर देखील मोकळी जागा राहते आणि या जागेतून व्हायरस तुमच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे दाढी वाढवू नका तिला नियमितपणे ट्रीम करा."
डॉ. अँथनी पुढे म्हणाले, "तसंच तुमटी दाढी जाड आणि लांब दाढी असेल तसंच जेव्हा तुम्ही श्वास घ्याल, बोलाल किंवा खोकाल तेव्हा व्हायरस तुमच्या मास्कमधून जिथे जागा आहे तिथून बाहेर पडू शकतात किंवा त्या जागेतून आलेल्या कणांनी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो."
चांगली दाढी राखण्यासाठी अशा उत्पादनांचा वापर करा करा जे दाढीला स्वच्छ आणि तीक्ष्ण कट देऊ शकतील. दाढी करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की तुमच्या दाढीचा आकार चेहऱ्यानुसार असणंही आवश्यक आहे.