या एका उपायाने घालवा अंडरआर्म्सचा काळेपणा

एखाद्या पार्टी अथवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर ज्यात आपण सुंदर दिसू असा ड्रेस निवडतो. मात्र अनेकदा ब्लॅक अंडरआर्म्स या सुंदरतेत बाधा आणतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकदा स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. मात्र घरगुती उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा घालवू शकता.

Updated: Dec 24, 2017, 01:58 PM IST
या एका उपायाने घालवा अंडरआर्म्सचा काळेपणा title=

मुंबई : एखाद्या पार्टी अथवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर ज्यात आपण सुंदर दिसू असा ड्रेस निवडतो. मात्र अनेकदा ब्लॅक अंडरआर्म्स या सुंदरतेत बाधा आणतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकदा स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. मात्र घरगुती उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा घालवू शकता.

साहित्य - टूथपेस्ट आणि लिंबू

कृती - सर्वात आधी अंडरआर्म्सना शेव्ह करुन घ्या. ज्यामुळे एकही केस राहता कामा नये. त्यानंतर थोडीशी टूथपेस्ट अंडरआर्म्सवर लावा. आता लिंबू कापून ते अंडरआर्म्सवर रगडा. कमीत कमी ४ मिनिटे स्क्रब करा. यानंतर १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर मऊ कपड्याने अथवा टिश्यूने पुसून घ्या. सलग तीन दिवस हा प्रयोग केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.