मीठ कसं आणि किती प्रमाणात खावं? तुमच्यासाठी कोणतं मीठ ठरेल बेस्ट?

सोडियम आणि आयोडीनचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो. अनेकदा याची कमतरता समस्या निर्माण करते.

Updated: Nov 5, 2022, 06:38 PM IST
मीठ कसं आणि किती प्रमाणात खावं? तुमच्यासाठी कोणतं मीठ ठरेल बेस्ट? title=

Which type of salt has the least sodium : मीठ हे आयोडीन आणि सोडीयमचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याचप्रमाणे सोडियम आणि आयोडीनचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो. अनेकदा याची कमतरता समस्या निर्माण करते. पेशींच्या योग्य कार्य आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीतच मीठ शरीराचा आवश्यक भाग आहे, पण मिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे. 

टेबल सॉल्ट किंवा सामान्य मीठ आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या 90 टक्के सोडियमची आवश्यकता पूर्ण करतं. जागतिक आरोग्य संघटना दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याची शिफारस देते. म्हणजे, एक चमचा मीठ. 

जास्त मीठ खाण्याचं नुकसान

जास्त मीठांचं सेवन केल्याने रक्तदाबाची समस्या वाढू शकते. याशिवाय हृदयविकार, जठराचा कॅन्सर आणि मेंदूतील रक्तप्रवाहावर याचा विपरीत परिणाम होतो. 

कोणत्या प्रकारच्या मीठामध्ये सोडियम कमी आहे? 

प्रत्येक घरांमध्ये मीठ हे वापरलंच जातं. यामध्ये 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराईड असतं. त्यात अशुद्धता नसते पण पोषणाच्या दृष्टिकोनातून मीठाचं सेवन योग्य नाही.

सागरी मीठ

खारट समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन करून तयार केल्याने क्षार परिष्कृत होत नाहीत. याशिवाय यामध्ये भरपूर आयोडीन असतं जे शरीरासाठी चांगलं मानलं जातं. समुद्री मीठामध्ये सामान्य मिठाच्या तुलनेत 10% कमी सोडियम असते.

रॉक सॉल्ट

हिमालयातून काढलेल्या मीठामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं प्रमाण योग्य असतं.

सेल्टिक मीठ

राखाडी मीठ ज्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं. या मीठामध्ये इतर खनिजं आणि क्षारांचं प्रमाण योग्य असतं. हे मीठ इतकं नैसर्गिक असतं की त्यात कोणतीही भेसळ नसते.

कमी सोडियम असलेलं मीठ खावं की नाही?

कमी सोडियम असलेल्या मीठाचं पाकीट बाजारात उपलब्ध असतं. पण या मीठाचं सेवन करावं की नाही? या मिठात सोडियमचं प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी असतं. पोटॅशियम सॉल्टच्या नावाने उपलब्ध असलेल्या मिठामध्ये सोडियम प्रमाण नसतं. ज्यांना सोडियम खाण्यास मनाई आहे अशा व्यक्तींनी या मिठाचं सेवन करावं.