Cholesterol Levels for your age in Marathi : आपल्या रक्तातात मेणासारखा एक पदार्थ आहे जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. या मेणासारख्या पदार्थाला कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. यातही गूड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकार आहेत. जेव्हा रक्तातातील हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं आणि आपल्या मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशात आपल्या गंभीर आणि हानिकारक आजारांचा सामना करावा लागतो. (What should be the cholesterol level of men and women according to age in marathi)
गेल्या काही वर्षांपासून बदललेली जीवनशैली आणि बाहेरचे अनहेल्दी पदार्थ, वाढता ताण आणि तासंतास बसून काम यामुळे पुरुष असो किंवा स्त्री यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी वयानुसार आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी याबद्दल सांगितलं आहे.
कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकारची असून डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) असं त्यांना म्हटलं जातं. जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण वाढलं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतो. ज्याला डॉक्टरी भाषेत प्लॅक असं म्हणतात. आर्टरीजमध्ये प्लॅकमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची भीती वाढते. तर रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी चांगलं असतं.
19 वयोगटातील व्यक्तींची कोलेस्ट्रॉल लेवल किती असावी?
19 वर्षांपर्यंतच्या तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल लेवल ही 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिज, असं मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. यात non-HDL 120 mg/dl पेक्षा कमी आणि LDL 100 mg/dl पेक्षा कमी पाहिजे. तर HDL 45 mg/dl पेक्षा जास्त पाहिजे.
20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांचं कोलेस्ट्रॉल लेवल किती असावी?
20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं एकूण कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असायला हवं. तर non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असणे गरजेच आहे. HDL लेवल 40 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक होणं असणे गरजेचं आहे.
20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्त्रियांचं कोलेस्ट्रॉल लेवल किती असावी?
20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये पाहिजे. तर non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी पाहिजे. तर HDL लेवल 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी.
वजन नियंत्रणात ठेवून व्यायाम करा. फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा. हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचं सेवन करा. अतिरिक्त साखर आणि मीठाचं सेवन टाळा. जंक फूड टाळा. वेळोवेळी तपासणी करुन घ्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)