महिलांनी बायपास सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

Coronary Bypass Surgery: बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय हा कमीत कमी जोखीम असलेला जसे की रोबोटिक-सहाय्यक प्रक्रिया, ज्यामुळे गुंतागुंत होण्याचा धोका टाळता येतो. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 18, 2024, 11:10 AM IST
महिलांनी बायपास सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स title=

Coronary Bypass Surgery: हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्यांच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणं यालाच बायपास सर्जरी असे म्हणतात. हृदयविकारासाठी बायपास शस्त्रक्रिया ही एखाद्याचे अमुल्य जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अवरोधित किंवा अरुंद धमनीच्या सभोवतालच्या रक्त प्रवाहाचा मार्ग बदलणे गरजेचे आहे. 

मुंबईच्या रूग्णालयातील कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, बायपास शस्त्रक्रिया ही जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका देखील कमी करू शकते. तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेच्या तंत्रांमधील प्रगतीमुळे, बायपास शस्त्रक्रियेचा यशाचा दर वाढत चालला आहे, ज्यामुळे गंभीर कोरोनरी धमनी विकार असलेल्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय हा कमीत कमी जोखीम असलेला जसे की रोबोटिक-सहाय्यक प्रक्रिया, ज्यामुळे गुंतागुंत होण्याचा धोका टाळता येतो. गंभीर हृदयविकार असलेल्यांसाठी बायपास शस्त्रक्रिया हा एक महत्त्वाचा उपचार पर्याय आहे तसेच हृदयाच्या आरोग्याचे रक्षण हा प्रतिबंधात्मक उपाय देखील आहे, असंही डॉ. भामरे यांनी सांगितलंय.

बायपास शस्त्रक्रियेनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चांगले परिणाम आणि कमी मृत्यू दर दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी संशोधन केले आहे. डॉ. भामरे म्हणाले, रिकव्हरी दरम्यान महिलांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, यामध्ये मानसिक परिणांचाही समावेश होतो. बायपास शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला रूग्णांसाठी योग्य परिणाम सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांनी याकडे पाहिजे आणि त्यानुसार उपचार योजना आखली पाहिजे. या विशिष्ट गरजा आणि महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानानुसार योग्य उपचार प्रदान केले गेले पाहिजे. बायपास शस्त्रक्रिया केल्यानंतर शरीर कमकुवत वाटू शकते, त्यामुळे वैद्यकिय सल्ल्याने हालचाली हळूहळू सुरू केल्या पाहिजेत. बराच वेळ एका जागी उभे राहणे टाळा, वेळोवेळी थोडे फिरू शकता. शस्त्रक्रियेनंतर, चालणे हा फुफ्फुस आणि हृदयासाठी चांगला व्यायाम आहे. आपण हळूहळू चालायला सुरुवात करू शकता.

कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG) ही स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अलीकडील अभ्यासांनी महिलांमधील सीएबीजीशी विचार आणि परिणामांवर प्रकाश टाकला आहे. संशोधन असे सूचित करते की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराची भिन्न लक्षणे दिसून येऊ शकतात, ज्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होतो. शिवाय महिलांमध्ये लहान कोरोनरी धमन्या असतात, ज्यामुळे शस्त्रक्रियेच्या परिणामांवर आणि रोगनिदानांवर परिणाम होऊ शकतो. 

महिला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंगला कसा प्रतिसाद देतात यात हार्मोनल घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. एस्ट्रोजेनचे कार्डिओप्रोटेक्टिव्ह प्रभाव असल्याचे दर्शविले गेले आहे, जे महिला रुग्णांमध्ये पुनर्प्राप्ती आणि शस्त्रक्रियेच्या एकूण यशावर परिणाम करू शकतात. महिलांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.