eauty Parlour Stroke syndrome : सेल्फ पॅम्परिंग (Self Care), म्हणत हल्ली अनेकजण ब्युटी पार्लरमध्ये जाताना दिसतात. तिथे जाण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. त्यातलंच एक कारण म्हणजे 'हेअर वॉश'. डोक्यावर छानसं मालिश केल्यानंतर सुवासिक शॅम्पू, कंडिशनर लावून केस धुण्यापासून ते मस्तपैकी सुकवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अनेकांना हवीहवीशी वाटते. पण, हे कितीही सुखावणारं असलं तरीही नकळतपणे तुम्ही (beauty parlour stroke) ब्युटी पार्लर स्ट्रोकचा शिकार होत असता. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, की वेळीच लक्ष न दिल्यास संकट जीवावरही बेतू शकतं. (what is beauty parlour stroke syndrome hair washing in parlour lead to death Know details)
न्युरोलॉजिस्ट Dr Sudhir Kumar यांनी यासंदर्भातील एक ट्विट करत सर्वांना ख़डबडून जागं केलं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, 'मी नुकतंच एका महिलेला पाहिलं, त्यांना मळमळ आणि उलटी यांसारखी लक्षणं होती. पार्लरमध्ये हेअर वॉश घेताना त्यांचा हा त्रास सुरु झाला होता. लक्षणं पाहता त्या महिलेला gastroenterologist कडे नेण्यात आलं'. महिलेच्या लक्षणांमध्ये काहीच सुधारणा झाली नाही, ज्यानंतर तिला ब्युटी पार्लर सिंड्रोम झाल्याचं कळलं.
रहेजा रुग्णालयातील Consultant Neurologist, Dr Kaustubh Mahajan यांच्या म्हणण्यानुसार सर्वप्रथम ब्युटी पार्लर स्ट्रोक म्हणजे काय, ही बाब आपण समजून घ्यायला हवी. यामध्ये मेंदूच्या अमुक एका भागाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे मेंदूच्या त्या भागाच्या नियंत्रणात असणाऱ्या शरीराच्या भागालाही ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि तो अवयव निकामी होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. .
पार्लरमध्ये केस धुण्यासाठी मान मागच्या बाजूला वाकवली जाते. अर्थात तिथे hyperextension ची क्रिया घडते. तेव्हा मानेला पोहोचणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. तोल जाणं, धुसर दिसणं, चक्कर येणं ही हायपरएक्सटेंशननंतरची लक्षणं.
फक्त पार्लरमध्ये धाव घेणाऱ्यांनाच या स्ट्रोकचा त्रास होतो का, तर याचं उत्तर आहे नाही. पण, जर पार्लरमध्ये हेअरवॉश केलं आणि त्यानंतर तुम्हाला चक्कर येणं, मळमळणं, तोल जाणं अशी लक्षणं दिसत असतील तर लगेचच neurologist चा सल्ला घ्या, तुम्हाला narrow arteries तर नाही ना याची खात्री करुन घ्या.
डॉक्टरांच्या सल्लानुसार Beauty parlour stroke syndrome वर वेळीच उपचार घेतल्यास संबंधित व्यक्तीला अडचणीतून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. पण, शरीराला होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा दीर्घ काळासाठी खंडीत राहिला तर परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे मान मागे वाकवल्यास तुम्हाला वरील कोणतीही लक्षणं दिसली, तर सर्वप्रथम एका सपाट पृष्ठावर सरळ झोपा. शरीरात सुरळीत रक्तपुरवठा होऊद्या. तरीही लक्षणं सातत्यानं दिसली तर मात्र डॉक्टरांकडे जा.