उंचीनुसार नेमकं किती असावं वजन? पाहा, निरोगी राहा...

Weight According to height : मुळात वजन कमी करण्यापेक्षा आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी.   

सायली पाटील | Updated: Nov 12, 2023, 09:10 AM IST
उंचीनुसार नेमकं किती असावं वजन? पाहा, निरोगी राहा...  title=
what is appropriate weight according to height health news

Weight According to height : आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. व्यग्र जीवनशैलीमुळे, बऱ्याचदा आहाराच्या सवयीसुद्धा इतक्या बिघडतात की बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळं संतुलन बिघडतं आणि वाढत्या वजनाची समस्या सतावू लागते. 

वजन वाढू लागलं की अनेकजण झोपेतून खडबडून जाग यावी त्याचप्रमाणं अनेकजण जागे होतात आणि व्यायाम, आहाराच्या सवयी हे सारं सारं पालन करण्यास सुरुवात होते. या सवयींनी काहींचं वजन कमीसुद्धा होतं. पण, काही मंडळी मात्र वजन कमी होत नाही म्हणऊन आणखी निराश होतात. या नैराश्यानं नकळत खाणं वाढतं आणि पुन्हा वजनही वाढतं. मुळात वजन कमी करण्यापेक्षा आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. 

पाहून घ्या उंची आणि वजनाचं समीकरण 

  • 4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.
  • 5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.
  • 5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
  • 5 फूट 4 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
  • 5 फूट 6 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो दरम्यान असलं पाहिजे.
  • 5 फूट 8 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो दरम्यान असलं पाहिजे
  • 5 फूट 10 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो दरम्यान असावं.
  • 6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावं.

हेसुद्धा वाचा : भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीकडे होतं 28 किलो सोनं, 10500 साड्या आणि 900 कोटींची संपत्ती 

तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सरासरी वयानुसार सांगू, कोणाचं वजन किती असावं. यानुसार तुम्ही लठ्ठ किंवा वजन कमी आहे हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल.