मुंबई : तुम्ही पाहिले असेल की कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान लोकांना अनेकदा मळमळ होते, तर बऱ्याच लोकांना उलट्यांचा त्रास देखील होतो. अशावेळी लोकांना चक्कर येणे, अस्वस्थता, मळमळ किंवा उलट्या यासारख्या समस्या उद्धभवतात. या सगळ्याला मोशन सिकनेस म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे फक्त प्रवासादरम्यानच का होते? किंवा असे सगळ्यांलसोबत का होत नाही? हे फक्त ठराविक लोकांनाच का होते? तर या मागील कारण आणि उपाय दोन्ही जाणून घ्या आणि पुढच्यावेळी प्रेवासाला जाण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या किंवा तुमच्या जवळील व्यक्तीला याबद्दल माहिती द्या.
प्रवासात उलट्या होणे याला मोशन सिकनेस लक्षणे म्हणतात. लक्षात ठेवा की मोशन सिकनेस हा एकादा आजार नाही. परंतु ही अशी स्थिती आहे, जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल मिळतात. यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून जाते. परंतु जर तुम्ही काही सावधगिरी बाळगली तर मोशन सिकनेसपासून मुक्त होण्याचे खूप सोपे आहे.
प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत, असेल तर कोणत्याही मोठ्या वाहनाच्या मागील सीटवर बसणे टाळावे. मागच्या सीटवर वेग जास्त जाणवतो, तसेच त्यावर आपल्याला दचके सुद्धा जास्त जाणवतात. तसेच ड्रायव्हरच्या मागची सीट देखील टाळा.
प्रवासात उलट्यांचा त्रास होत असल्यास पुस्तक अजिबात वाचू नका. पुस्तक वाचल्यामुळे तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश जातो.
जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडा आणि बाहेरची ताजी हवा घ्या. संपूर्ण गाडीत ताजी हवा नसल्याने तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो.
रिकाम्या पोटी प्रवास केल्यास उलट्या होत नाहीत हा समज लोकांमध्ये आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेकदा जे लोक काहीही न खाता प्रवासाला निघतात, त्यांना मोशन सिकनेसचे प्रमाण अधिक असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जड आहार घ्या. हलका आणि सकस आहार घेऊनच प्रवासाला जा.
प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असल्यास घराबाहेर पडण्यापूर्वी काही सोपी तयारी करा. या सोप्या उपायांमुळे तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
1. जेव्हाही तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा एक एक लिंबू सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळ वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि असे केल्याने उलट्या होणार नाहीत.
2. लवंगा भाजून बारीक करून एका डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रवासाला जात असाल तेव्हा ते सोबत घ्या. उलट्या होत असल्यास चिमूटभर साखर किंवा काळे मीठ टाकून चोखत राहावे.
3. तुळशीची पाने चघळल्याने उलट्या होत नाहीत. याशिवाय लिंबू आणि पुदिन्याचा रस एका बाटलीत काळे मीठ टाकून ठेवा आणि प्रवासादरम्यान ते थोडे-थोडे प्या.
4. लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ शिंपडा आणि चाटून घ्या. याने तुमचे मन ठीक राहील आणि उलट्या होणार नाहीत.
5. जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तिथे बसण्यापूर्वी एक पेपर टाका आणि मग बसा. यामुळे तुम्हाला उलट्या होणार नाहीत.