आजूबाजूला लोक असूनही एकटेपणा जाणवतोय? जाऊन घ्या यामागील मानसिक लक्षणं..

Loneliness Symptoms: फिलिंग ऑफ लोनलीनेस (Causes of Loneliness) आज एक समस्या झाली आहे. परंतु अनेकदा यामागील कारणं आणि लक्षणं काय असतात याबद्दल लोकांच्या पटकन लक्षात येतच नाही. त्यातून त्यांना सतत एकटं वाटतं राहते. परंतु याची लक्षणं वेळीच ओळखणं आवश्यक आहे.

Updated: Apr 25, 2023, 04:27 PM IST
आजूबाजूला लोक असूनही एकटेपणा जाणवतोय? जाऊन घ्या यामागील मानसिक लक्षणं.. title=

Loneliness Symptoms in Marathi: आपल्याला अनेकदा लोकांमध्ये असूनही एकटं (Loneliness) राहिल्यासारखं वाटतं त्यातून आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण लोकांमध्ये एकरूप होऊ शकत नाही. आपल्याला अधिक एकटं वाटू लागलं की आपली मानसिक स्थितीही बिघडू शकते. तेव्हा अशावेळी आपल्यालाही काही प्रयत्न करावे लागतात नाहीतर आपण नैराश्यानं (Depression) ग्रासू शकतो. समुपदेशन आपल्याला मदत करू शकते. अनेकदा समाजात वावरताना आपल्याला एकटं वाटू लागते. आपल्यालाही वगळले जाते आहे की काय असं वाटू लागते.

प्रामुख्यानं कामाच्या ठिकाणी आपल्यालाही अधिक एकटं वाटू लागतं. ऑफिसमध्ये आपण फारसे कोणाशी बोलू शकत नाही किंवा आपल्याला (Feeling alone at office) आपलेच सहकारी त्यांच्यात घेत नाहीयेत अशी आपली भावना निर्माण होऊ लागते. 

परंतु हे असं का होतं? याची लक्षणं आणि कारणं वेळीच समजून घेणे हे आवश्यक असते. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे ऑफिस, सिनेमागृह, फॅमिली फंगशन, सण-सभारंभ अशावेळी आपल्यालाही अनेकदा आपण लोकांमधून वगळले जात आहोत की काय असं वाटू लागते. या कारणं ही वेगवेगळी असू शकतात. आपण जर का लोकांमध्ये बसून जास्त बडबड करत असून तर अशावेळी आपल्याला इतरांकडून कदाचित फारसा चांगला प्रतिसाद येणार नाही. उदाहरणार्थ जर का तुम्ही अति बडबड करत असाल तर कामाच्या ठिकाणी असणारे तुमचे सहकारी तुम्हाला डावलू शकतात. (what are the symptoms of loneliness read the full article in detail)

दुसरं असंही की जर तुम्ही शांत आणि मनस्वी स्वभावाचे असाल तरीही लोकं तुम्हाला वगळू शकतात. परंतु दरवेळेला मितभाषी आणि चांगूलपणा दाखवूनही फायदेशीर ठरत नाही तसेच वर म्हटल्याप्रमाणे उद्धट बोलणे अथवा खूप बडबड करणंही कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांना अशी प्रवृत्तीची माणसं ही खूप इरेटेटिव्हही वाटू शकतात. तेव्हा यातला सुवर्णमध्य आपल्याला काढायचा असतो. परंतु ज्यांना असं वाटतं की आपण कामाच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी खूप एकटे पडतो आहोत किंवा आपल्यालाही वेगळे जात आहे तर त्यामागे मानसिक कारणंही (Causes and Symptoms of Loneliness) असू शकतात. तेव्हा यावर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. 

एकटेपणाची लक्षणे काय आहेत? 

  • विचार करण्यात अडथळा निर्माण होणे. 
  • हताश वाटणे.
  • जास्त पाणी प्यावेसे वाटणे.
  • भूक न लागणे. 
  • झोप न येणे. 
  • सतत चिंता वाटणे.
  • कामाच्या ठिकाणी कोणी काही बोललं की त्याचं वाईट वाटून घेणे. 
  • डोकेदुखी
  • खर्च करणे.
  • जास्त टेलिव्हिजन, चित्रपट, मोबाईल पाहणे.
  • दिवास्वप्नात रमणे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)