केवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes

साखरेला मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.

Updated: Mar 28, 2022, 05:18 PM IST
केवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes title=

मुंबई : मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. जर एखाद्याला एकदा हा आजार झाला तर संपूर्ण आयुष्यभर त्या व्यक्तीला या आजारात काढावं लागतं, ज्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्यावर देखील बंधणं येतात. मधुमेह किंबा डायबिटीज हा रुग्णाच्या रक्तातील आजार आहे. जो त्याच्या रक्तात साखरेची पातळी वाढवतो. ज्याला डॉक्टर इन्सुलिनच्या माध्यमातून त्याला कमी करतात. परंतु हा आजार पूर्णपणे संपत नाही. या आजाराला किंवा रक्तातील साखरेच्या पातळीला तुम्ही बरोबर ठेवले, तर ते रुग्णाला त्रास देत नाही. परंतु जर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं, तर मात्र त्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेकदा साखर किंवा रिफाइंड कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थ हे मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.

जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

फळांचा रस

फळांचे रस हे शरीरासाठी चांगले आणि उपाय युक्त पेय मानले जातात, परंतु दुर्दैवाने, रक्तातील साखरेवर त्यांचा परिणाम इतर शर्करायुक्त पेयांसारखाच असतो. एवढेच नाही तर फळांच्या रसामध्ये फ्रक्टोजचे प्रमाणही जास्त असते. फ्रक्टोज इन्सुलिन प्रतिरोध, लठ्ठपणा आणि हृदयरोगाशी संबंधित आहे.

ड्रायफ्रुट्स

फळे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसह अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहेत. परंतु जेव्हा कोणतेही फळे सुकतात, तेव्हा ते पाणी गमावतात, ज्यामुळे या पोषक घटकांचे प्रमाण वाढते. परंतु त्यांच्यातील साखरेचे प्रमाण देखील वाढते. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही जास्त सुका मेवा खाऊ नये.

दुग्ध उत्पादने

दुग्धजन्य पदार्थ प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. त्यांच्या सेवनातून कॅल्शियम आणि जीवनसत्त्वेही मिळतात. पण दुग्धजन्य पदार्थांमध्ये लैक्टोज नावाची साखर देखील असते. जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ घेत असाल, तर तुम्ही कर्बोदक पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. एका अभ्यासानुसार, उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.

कॉफी

तसे पाहाता कॉफी अनेक गोष्टींसाठी फायद्याची आहे, तसेच मधुमेहाचा रुग्णांना देखील यामुळे धोका कमी होतो. परंतु जर यामध्ये साखर टाकून प्यायल्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकते. याशिवाय फ्लेवर्ड कॉफीमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. तुम्हाला तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल आणि वजन वाढण्यापासून रोखायचे असेल, तर अर्धा चमचा साखरेचा वापर तुम्ही करु शकता.