वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी

Flax Seed Benefits: प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आणि बारीक दिसावं. पण अनेक प्रयत्न करुनही आपलं वजन काही केला कमी होतं नाही. एका  Seeds ने तुम्ही मेणासारखी चरबी वितळू शकतो. 

नेहा चौधरी | Updated: May 9, 2023, 01:42 PM IST
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी title=
Weight Loss Tips benefits of flax seeds in weight loss health news in marathi

Flax Seed Benefits in Marathi: कामाचा वाढता ताण, अपुरी झोप आणि अवेळी जेवण या कारणांमुळे अनेकांची वजन आज वाढलेली आहे. त्यात अनहेल्दी फूड, फास्ट फूडमुळे कितीही व्यायाम आणि योगा केला तरी वजन कमी (weight control tips) होत नाही. मग आता काळजी करायची गरज नाही. तुमच्या किचनमध्ये असलेल्या या एका सिड्सने तुम्ही झपाट्याने वजन कमी करु शकता. (Weight Loss Tips in marathi) 

वजन कमी करण्यासाठी 'या' सिड्स उत्तम 

सुंदर केसांपासून अनेक आजाऱ्यांवर (Health Benefits Of Flax Seeds) जवस किंवा आळशीच्या बिया (Flax Seeds) या खूप फायदेशीर ठरतात असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आज आपण जवसाचं वजन कमी करण्यासाठी (benefits of flax seeds in weight loss)कसा फायदा होतो ते जाणून घेणार आहोत. 

flaxseedsweightloss

सूपरफूड !

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते अंबाडी, जवस किंवा आळशीच्या बियांना सूपरफूड असं म्हणतात. या बियांमध्ये भरपूरप्रमाणात ओमेगा - 3 फॅटी अॅसिड आहेत. हे आरोग्यासाठी खूप उत्तम मानलं जातं. त्याशिवाय प्रथिने, मॅग्नेशियम, तांबे, अमिनो अॅसिद आणि फॉस्फरसदेखील आढळतं. यामुळे जवस हे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. 

वजन कमी करण्यासाठी असा करा वापर!

डाळीत मिसळून खा 

जवसाच्या बियांचा रोजच्या जेवण्यात वापर करा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मसूरच्या डाळीत जवसाच्या काही बिया घाला आणि मग ती डाळ शिजवा. ही डाळ खाल्ल्याने झपाट्याने वजन कमी होईल. 

सॅलाडमध्येही उत्तम 

तुम्ही जवसाच्या बियांचा उपयोग सॅलाडमध्येही करु शकता. सॅलाडमध्ये या फ्लेक्सचा वापर केल्यास अतिरिक्त चरबी मेणासारखी वितळते. 

ड्रायफ्रुट्ससोबत खा

ड्रायफ्रुट्स आणि फ्लेक्स सिड्स एकत्र खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदा होतो. त्याशिवाय तुमचं शरीर निरोगी राहतं. 

हेसुद्धा वाचा - Weight Loss Tips : 'ही' डाळ खाल्ल्याने झपाट्याने वजन होतं कमी

पाण्यातून घ्या 

हो तुम्ही पाण्यासोबत पण जवस खाऊ शकता. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक चमचा भाजलेला जवस खा आणि एक ग्लास पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी ही सर्वात फास्ट आणि उत्तम पद्धत आहे. 

हेसुद्धा वाचा  - G-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)