वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

 तुम्ही तुमचे वाढते वजन घरगुती उपाय करुनही कमी करू शकता.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 27, 2017, 08:07 PM IST
वजन कमी करण्याचा घरगुती उपाय  title=
मुंबई : एका महिलेला जाडी म्हटल्याने तिने पोलीस तक्रार केल्याची घटना नुकतीच समोर आली. जाड असण, वजन वाढणं असे विषयही त्यानंतर चर्चेत आले. 
 
पण आज आपण असा एक उपाय जाणून घेवूया ज्यानंतर तुम्हाला चिडविण्याची कोणावर वेळ येणार नाही. 

वाढत्या वजनाची समस्या 

आपण स्लीम-फीट असावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याची चूकीची वेळ, व्यायामाचा अभाव, खाण्यावर नसलेल नियंत्रण अशा अनेक कारणामूळे वजन हे वाढत जात. वाढते वजन, लठ्ठपणा ही सध्याच्या घडीला अनेकांची समस्या झाली आहे. 

वेळ निघून जाते

वजन कमी करण्यासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात. पण त्याचा काहीच फायदा होत नसल्याचे नंतर लक्षात येते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.  

चयापचय क्रिया सुधारते

 तुम्ही तुमचे वाढते वजन घरगूती उपाय करुनही कमी करू शकता.
 
 घरगुती मसाल्यामध्ये वापरलेले दालचिनी यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. दालचिनी वापर केल्याने आपली चयापचय क्रिया सुधारते.  

 उर्जेचे क्रियेत रुपांतर 

संशोधनात असे दिसून आले आहे की, दालचिनीच्या चवीसाठी  सिनामाल्डीहायड एक आवश्यक तेल आहे, ज्यामुळे चरबीच्या पेशींवर (एस्पिपिस) परिणाम करून चयापचय वाढते. उष्मांकनाच्या प्रक्रियेतून उर्जेचे क्रियेत रुपांतर सुरू होते. 

'वू म्हणतात..'

मिशिगन विद्यापीठातील संशोधक सहाय्यक प्राध्यापक जुन वू म्हणाले, "दालचिनी हा हजारो वर्षांपासून आपल्या आहाराचा एक भाग आहे आणि लोक त्याचा वापर करीत आहेत"
 
"वजन कमी करण्यास मदत होत असल्याने दालचिनीचा उपयोग करायला हवा, ही आपल्या पचनक्रियेसाठीही चांगली असल्याचे " वू यांनी सांगितले.