Belly Fat कमी करेल 'हे' घरच्या घरी तयार केलेलं ड्रिंक; आजच ट्राय करा

जाणून घेऊया वजन कमी करणारं पेय कसं बनवलं जातं.

Updated: Aug 25, 2022, 06:38 AM IST
Belly Fat कमी करेल 'हे' घरच्या घरी तयार केलेलं ड्रिंक; आजच ट्राय करा title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच जण वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. केवळ पोटावरच नाही तर मांडी, कंबर आणि दंडावरही चरबी जमा होऊ लागते. त्याच वेळी, तुमच्या व्यस्त जीवनशैलीत वर्कआउटसाठी वेळ काढणं सोपं नसतं. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात. 

यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका ड्रिंकबद्दल माहिती देणार आहोत. हे वजन कमी करणारं पेय जिऱ्यापासून बनवलं जातं. जे पोटाच्या चरबीवर चांगला प्रभाव दाखवतं. चला जाणून घेऊया वजन कमी करणारं पेय कसं बनवलं जातं.

जीरा वेट लॉस ड्रिंक

भारतीय लोकांच्या किचनमध्ये भाज्या आणि इतर पदार्थांमध्ये घालण्यासाठी जिरं हा एक खास मसाला आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, त्यापैकी एक म्हणजे वजन कमी करणं. जिरे पचन सुधारण्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये भरपूर लोह असतं, शरीराची जळजळ कमी करण्यासाठी जिऱ्याचं सेवन केलं जाऊ शकतं आणि जिरं चरबी देखील कमी करतं.

जिऱ्याचं ड्रिंक बनवण्यासाठी 2 चमचे जिरं रात्रभर पाण्यात किंवा किमान 5 ते 6 तास भिजत ठेवा. यानंतर हे पाणी उकळून गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 आठवडे प्या. त्याचा परिणाम हळूहळू दिसून येतो.

जिरे पावडरने तयार केलेलं ड्रिंक

जिरं भिजवण्याव्यतिरिक्त, त्याची पावडर करून ड्रिंक तयार केलं जाऊ शकतं. यासाठी जिरं बारीक करून घ्या. आता एक कप पाणी उकळून त्यात एक चमचा जिरेपूड घाला. जेवणानंतर ते पिणं फायदेशीर आहे.