लग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या

तर जाणून घेऊया वयात असलेल्या अंतरामुळे लग्न संसारात काही फरक पडतात का? 

Updated: Sep 27, 2022, 06:40 PM IST
लग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या  title=
Want to have a successful life journey after marriage Learn these tips NZ

Relationship Tips: सर्वसाधारणपणे प्रत्येक जण आज नाहीतर उद्या लग्न करतोच. पण लग्न ठरवताना किंवा लग्नाचा निर्णय घेताना लग्नाळूंना बरेचसे प्रश्न पडतात. बऱ्याचदा योग्य माहिती नसल्यास व्यक्तींचा गोधंळ होतो. एका मुला आणि आणि मुलीत लग्नासाठी किती गॅप असायला हवा? सध्या लग्न करताना मुला आणि मुलीच्या वयात मोठा गॅप पाहायला मिळतो. बॉलीवूडमध्ये याची उत्तम उदाहरण पाहायला मिळतील. 'निक जोनस'पेक्षा (Nick Jonas) 'प्रियंका चोप्रा' (Priyanka Chopra) ही 10 वर्षांनी मोठी आहे तर 'करिना कपूर' (Kareena Kapoor) ही 'सैफ अली खान'पेक्षा (Saif Ali Khan) 12 वर्षांनी लहान आहे. लग्न करताना 'age is just number' असं म्हणं कितपत योग्य आहे.  तर जाणून घेऊया वयात असलेल्या अंतरामुळे लग्न संसारात काही फरक पडतात का? (Want to have a successful life journey after marriage Learn these tips NZ)

1. लग्नात 5 ते 7 वर्षाचा गॅप असल्यास 

लग्नात 5 ते 7 वर्ष गॅप असलेल्या जोडप्यांचे  फारसे भांडण पाहायला मिळत नाही. त्याच्यांमधील दोन्ही व्यक्ती या समजूतदारपणे परिस्थिती हाताळत असतात त्यामुळे एकमेकांशी जुळवून घेताना त्यांना अडचणी येत नाहीत. हे वयातील अंतर इतरांपेक्षा खूपच आदर्श आहे. कारण ते जोडप्यांना स्थिरता प्राप्त करण्यास आणि एकमेकांना जवळच्या दृष्टीकोनातून समजून घेण्यास मदत करते.

आणखी वाचा... Good Habits : तरुणपणातच स्वतःला लावा या 9 सवयी.. पूर्ण जग तुमच्यामागे धावेल..

2. लग्नात 10 वर्षाचा गॅप असल्यास

जर तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा 10 वर्ष मोठा असेल तर त्या जोडप्यांमध्ये पुरेसे प्रेम आणि समज असल्यास 10 वर्षांचा हा फरक नात्यामध्ये जाणवणार नाही. तुमची ध्येयं, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टीकोण एकसारखा असल्यास तुमचं नातं टिकून राहू शकतं. काहीवेळा, तरुण जोडीदार मोठ्या जोडीदाराच्या मत आणि विचारांसोबत सहमत नसल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

3. लग्नात 20 वर्षाचा गॅप असल्यास 

जोडप्यांसाठी इतके अंतर बरं नाही. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्या वयात 20 वर्षांपेक्षा जास्त अंतर आहे. अशात तुमच्या विचारांमध्ये खूप अंतर असू शकते. ध्येय, महत्त्वाकांक्षा आणि मतांमध्ये खूप मोठे फरक पाहायला मिळतात. याने तुमची मुलं होण्याची गरज आणि प्रत्यक्षात त्याची पूर्तता होण्यास त्रास सहन करावा लागू शकतो. मोठ्या जोडीदाराला शक्य तितक्या लवकर मुले व्हावीत असे वाटत असतं. पण लहान जोडीदार या संधीसाठी फारसा उत्सुक नसू शकतो. त्यांच्या विचारसरणीतील फरक हा सर्वात मोठा दोष ठरू शकतो. सध्याचे जग प्रत्येक क्षणाने बदलत असल्याने मतांमध्ये प्रचंड मतभेद असतील. सर्वसाधारणपणे, वयातील अंतर जितके जास्त तितक्या जास्त समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

लग्नात असलेला गॅप प्रत्येक कपल्सच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीनं काम करत असतो. गरजेचे नाही की एखाद्याच्या आयुष्यात जे घडलं ते तुमच्याही आयुहस्यात घडेल. शेवटी तुमच्या समजूतदारपणात तुमचं शहाणपण दिसतं असं तज्ज्ञ सांगतात.

Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)