'या' योगा गुरूमुळे देशा-परदेशात वाढतोय 'भारता'चा मान

जगभरात जागतिक योग दिनाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. नरेंद्र मोदी या दिवसाचं महत्त्व जगभरात पोहचवण्यासाठी खास प्रयत्न करत आहेत. नियमित एका अ‍ॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून योगासनाची माहिती नरेंद्र मोदी शेअर करत आहेत. 

Updated: Apr 30, 2018, 04:53 PM IST
'या' योगा गुरूमुळे देशा-परदेशात वाढतोय 'भारता'चा मान  title=

मुंबई : जगभरात जागतिक योग दिनाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. नरेंद्र मोदी या दिवसाचं महत्त्व जगभरात पोहचवण्यासाठी खास प्रयत्न करत आहेत. नियमित एका अ‍ॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून योगासनाची माहिती नरेंद्र मोदी शेअर करत आहेत. 
नरेंद्र मोदींसह इतर योगा गुरूदेखील या खास भारतीय परंपरेचा ठेवा जगभरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

विनोद रावत यांची खास कामगिरी 

उत्तराखंड राज्यातील वोनोद रावत हे योगा गुरू सध्या जपानमध्ये खास काम करत आहेत. जपानमधील लोकांना ते योगसाधनेचे धडे देत आहेत. तेथे त्यांना योगी विनी या नावाने ओळखले जाते. योगसाधनेचे धडे जगभर पोहचण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. योगी विनीच्या नावाने ओसाका (जपान) आणि भारतातील ऋषिकेश या ठिकाणी खास योग शाळा सुरू आहेत. 

तणाव करा दूर  

मीडियाशी बोलताना योगी विनी यांनी सांगितल्यानुसार, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. भारतामध्ये योगामुळे मेडिकल टुरिझम ही संकल्पना वाढत आहे. परदेशातही अनेकांनी या भारतीय मूल्यांचा स्वीकार करून त्यांच्या जीवनात बदल केले आहेत.