मुंबई : काही मुलांना क्लिन शेव्ह लूक आवडीचा असतो. मात्र सतत शेव्हिंग केल्याने पुरूषांच्या त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता दाट असते. ब्लेडच्या अतिवापरामुळे त्वचा रखरखीत होते. शेव्हिंगमुळे त्वचेचे नुकसान टाळायचे असेल तर स्वयंपाकघरातील एक खास पदार्थ तुमच्या मदतीला नक्की येऊ शकतो.
शेव्ह करण्यापूर्वी पाच मिनिटं आधी गालांवर ( जिथे शेव्ह करायचे आहे तो भाग) लिंबाचा रस लावावा. त्यानंतर हातावर थोडे पाणी घेऊन ज्या भागावर लिंबाचा रस लावला आहे त्या ठिकाणी मसाज करावा.
काही वेळाने तुम्हांला त्वचा मुलायम झाल्यासारखी वाटते. त्यानंतर चेहरा साबणाशिवाय स्वच्छ करावा. सोबतच चेहरा कोणत्याही कापडाशिवाय किंवा टॉवेलने पुसू नये.
शेव्हिंग करताना ब्लेड योग्य दिशेने फिरवावे. विनाकारण त्वचेवर रेझर फिरवणं, घाईत घासणं टाळा. लिंबाच्या रसामुळे त्वचा मुलायम झाल्याची तुम्हांला जाणवत असेल.
शेव्हिंग करण्यापूर्वी नियमित हा उपाय केल्यास त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. लिंबाच्या वापरामुळे त्वचा रखरखीत होण्याचा धोका सहाजिकच कमी होईल.