Viagra for women : महिलांसाठीही असते व्हायग्रा गोळी? पाहा काय आहे सत्य?

वायग्रा (Viagra) म्हटलं की, हमखास याचा संबंध पुरुषांशी जोडला जातो. इतकंच नाही तर वायग्रासंदर्भात विविध गोष्टींची चर्चा केली जाते. याला नेहमी सेक्शुअल पॉवर वाढवण्याची गोळी, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का याचा महिलांसाठीही वापर केला जाऊ शकतो. 

Updated: Mar 23, 2023, 10:40 PM IST
Viagra for women : महिलांसाठीही असते व्हायग्रा गोळी? पाहा काय आहे सत्य? title=

Viagra for women : वायग्रा (Viagra) म्हटलं की, हमखास याचा संबंध पुरुषांशी जोडला जातो. इतकंच नाही तर वायग्रासंदर्भात विविध गोष्टींची चर्चा केली जाते. याला नेहमी सेक्शुअल पॉवर वाढवण्याची गोळी, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का याचा महिलांसाठीही वापर केला जाऊ शकतो. 

वायग्रा म्हणजे नेमकं काय?

वैद्यकीय भाषेमध्ये व्हायग्रा म्हणजे, मानवी शरीराच्या कोणत्याही भागात रक्त प्रवाह म्हणजे ब्लड सर्कुलेशन जलद गतीने करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. यापूर्वीही तुम्ही या गोळीचं नाव ऐकलं असेल. सामान्यतः ही गोळी इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी वापरण्यात येते. या मार्फत लिंगाच्या स्नायूंना म्हणजेच पिनाइल मसल्सना रक्तपुरवठा देखील वाढतो.

व्हायग्रा सुरक्षित आहे का?

सामन्यापणे व्हायग्रा सुरक्षित ड्रग मानलं जातं. व्हायग्राचा डोस हा 25 मिलीग्राम ते 100 मिलीग्राम यांच्यामध्येच असला पाहिजे. मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात व्हायग्रा ड्रग घेणं रिस्की ठरू शकतं. त्यामुळे या ड्रगचा डोस प्रमाणापेक्षा जास्त घेणं टाळावं. 

महिलांसाठीही असतो व्हायग्रा?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हा एक समज आहे की, व्हायग्रा फक्त पुरुषांसाठी वापरण्यात येतो. Viagra चा उपयोग कामवासना (लिबिडो) वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघंही याचा वापर करू शकतात. Endometrial thickness म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराची जाडी वाढवण्यासाठी डॉक्टर महिलांना प्रिस्क्रिप्शनमध्ये व्हायग्रा लिहून देतात. यावेळी गर्भाशयापर्यंत योग्यरित्या रक्तपुरवठा करण्यासाठी या गोळीचा वापर केला जातो. 

प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतं व्हायग्राचं ड्रग

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राचं ड्रग तुम्हाला मिळू शकतो. मात्र यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. मुख्य म्हणजे, आपण हे समजून घेतलं पाहिजे की, व्हायग्रा हे देखील एक औषधच आहे. त्यामुळे त्याचं सेवन करण्यापूर्वी या ड्रगचा वापर शरीरावर कसा होतो हे जाणून घेतलं पाहिजे.

व्हायग्रा गोळीचं सेवन केव्हा करू नये?

  • तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दारूचं सेवन केल्यानंतर व्हायग्राच्या ड्रगचा वापर करू नये
  • जर तुमची कोणती दुसरी औषधं सुरु असतील तर या ड्रगचं सेवन करणं टाळावं. 
  • जर तुमचं ब्लड प्रेशर कमी असेल तर व्हायग्रा गोळी घेणं टाळलं पाहिजे.
  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींनी याचा वापर करू नये.
  • स्तनपान देण्याऱ्या महिलांनी व्हायग्रा गोळीचं सेवन करू नये