How to store eggs : आपला ब्रेकफास्ट हा अंड्यांशिवाय पुर्ण होतच नाही. त्यामुळे आपल्या रोज ताजी अंडी ही लागतातच. तेव्हा आपल्याला फ्रेश अंडी खाण्याची सवय ही असतेच. अंडी ही सदैव फ्रेश राहावीत यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. अंडी ही 12 ही महिने ताजी राहवीत यासाठी तुम्ही काही ट्रीक्स वापरू शकता. अनेकदा आजारातून आणलेली अंडी ही खराब असण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्याला अशी अंडीही वेळेवर खराब आहेत की नाही हे तपासून पाहणे गरजेचे असते. खराब अंडी खाल्ल्यानं आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. तेव्हा ताजी अंडी खाणं हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते. खराब झालेली अंडी ओळखणंही फार महत्त्वाचं असते. घरच्या घरी बसून तुम्ही ही अंडी खराब आहेत की नाही हेही ओळखू शकतात.
जर का अंड हे पाण्यात टाकताच लगेच बुडाले तर हे अंड ताजं आहे परंतु जर का खराब झालेले अडं असले तर ते पाण्यात तरंगत राहते. जर का थंड पाण्यात अंड टाकल्यावर त्यातून आवाज आला तर समजावे की अंड हे खराब झालेले आहे.
अंडी ताजी राहावीत म्हणून काय करावे?
अंडी खराब होऊ नये म्हणून तुम्ही घरगुती उपाय करू शकता. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा फार जास्त फायदा होईल. खराब अंडी खाणं टाळावीत अन्यथा त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होता. अंडी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. तुम्ही रोज अंडी खावीत. आपल्याला त्यातून अनेक फायदे मिळतात. चिकन खाणंही आपल्या फायद्याचे असते. काही लोकांना फक्त अंड खायला आवडते तर काहींना चिकन जास्त आवडते.