मुंबई : नेलपॉलिश लावले कोणाला आवडत नाही? नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि नखं अधिक आकर्षक दिसण्यासाठी महिला आर्वजून नेलपॉलिशचा वापर करतात. पण अनेकदा नेलपॉलिश लावल्यानंतर ती जास्त काळ टिकत नाही. मग नखांवर असलेली अर्धवट नेलपॉलिश दिसायला चांगली दिसत नाही. नखांवर लावलेली नेलपॉलिश अधिक काळ टिकण्यासाठी हे उपाय करुन पहा...
१. नखं साफ केल्यानंतरच त्यावर नेलपॉलिश लावा. जून्या नेलपॉलिशवरच नवीन लावल्याने एक जाडसर थर तयार होतो आणि ती जास्त दिवस टिकत नाही.
२. नेलपॉलिश लावल्यापूर्वी नेलपॉलिशची बॉटल नीट हलवून घ्या. असे केल्याने नेलपॉलिश एकसंध होईल आणि नखांवर योग्यरीत्या लागेल.
३. नेलपॉलिश लावल्यापूर्वी बेस लावून घ्या. ट्रांसपेरेंट बेस लावल्याने वर लावलेली रंगीत नेलपॉलिश अधिक काळ टिकते.
४. नेलपॉलिश लावताना एक दोन कोट लावा. त्यामुळे नेलपॉलिश नखांवर जास्त काळ राहील. पण एक कोट सुपल्यानंतरच दुसरा कोट लावा.