नवी दिल्ली : आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते. त्यामुळे दिवसभर आपण खुर्चीवर बसलेले असतो. नाश्ता, जेवणानंतरही आपण लगेचच कामाला लागतो. त्यामुळे आपले स्थानू आखडले जातात. त्याचबरोबर एकाच स्थितीत दिवसभर बसल्याने गुडघ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे २ मिनीटांचा वेळ काढून गुडघ्याच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास पुढील त्राल टाळता येतील.