Pimples acne problems: : चेहर्यावर पिंपल्स (Pimples) किंवा अॅक्ने (acne) वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. आता हा त्रास कोणत्याच विशिष्ट वयोगटापुरता सीमित राहिलेला नाही. प्रदूषण,(pollution) ताणतणाव (stress) खाण्या पिण्याच्या सवयी, हार्मोन्समध्ये (harmonal changess) होणारे चढ उतार अशा अनेक कारणांमुळे अॅक्नेचा त्रास उद्भवतो. अॅक्नेचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हांला त्याचं नेमकं कारण ठाऊक असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर उपाय करता येऊ शकतो. मग अशा उपचारांचा अधिक सकारात्मक परिणाम दिसावेत असे तुम्हांला वाटत असेल तर आहारात काही पदार्थांचा समावेश टाळणं गरजेचे आहे.
आहारत प्रामुख्याने लो फॅट पदार्थांचा समावेश करताना त्यामधील फॅट काढले तरीही साखर मिसळली जाते. यामुळे त्याचा फ्लेवर तसाच ठेवला जातो. जर्मन क्लिनिकल डर्मटॉलॉजीच्या एका अभ्यासानुसार, साखरेमुळे शरीरात कोलायजन फायबरचं नुकसान होते. हे नुकसान भरुन काढणं कठीण जातं.
युरोपियन जर्नल ऑफ डर्मटॉलॉजीच्या अहवालानुसार, एका अभ्यासानुसार, ग्लुटन इंटॉलरन्स आणि पिंपल्स हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हांला ग्ल्यूटन इंटॉलरन्सचा त्रास असेल तर ग्ल्युटनयुक्त पदार्थ आहारात टाळा.
जर्नल ऑफ अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्मटॉलॉजीमध्ये छापण्यात आलेल्या अभ्यासानुसार, स्किम मिल्क पिणार्यांमध्ये इतरांच्या तुलनेत पिंपल्सचा त्रास अधिक असतो. दूधातील हार्मोन्स आणि बायोअॅक्टिव्ह मॉल्युकल्स त्वचेशी निगडीत समस्या वाढवतात.
स्मुदीज आरोग्यदायी असतात परंतू बाजारात मिळणार्या पॅकेटबंद किंवा अति फ्रुक्टोजचा समावेश असणार्या स्मुदीज टाळा. जर्नल एक्सपरिमेंटल डायबेटीस रिसर्चच्या अहवालानुसार फ्रुक्टोजचा आहारात अधिक समावेश केल्यास त्वचेला नुकसान होते.
सोयाबीनच्या तेलामध्ये ट्रान्सफॅट आणि ओमेगा 6 मुबलक प्रमाणात असते. जर्नल ऑफ क्लिनिकल अॅन्ड एस्थेस्टिक डर्मटॉलॉजीच्या अहवालानुसार, या तेलामुळे त्वचेचे नुकसान होते. नक्की वाचा - या 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्यावरील ओपन पोअर्सचा त्रास