तुमच्या पायाचं असं दुखणं असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण!

तुमचे पाय, तुम्हाला अनेक आजारांचे संकेत देतात.

Updated: Mar 20, 2022, 02:59 PM IST
तुमच्या पायाचं असं दुखणं असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण! title=

मुंबई : आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्याला आजाराचे संकेत देत असतो. त्या व्यक्तीला केवळ ते समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखादी व्यक्ती बरी असते आणि दुसऱ्याच दिवशी आजारी पडते. असे अनेक आजार आहेत, ज्यांची लक्षणं दिसून येतात. 

अनेकदा व्यक्तीला त्या संबंधित आजाराची लक्षणं समजतात, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय, जे आपल्याला अनेक आजारांचे संकेत देतात. कसे हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला पायातील अशा काही बदलांबद्दल सांगत आहोत, जे गंभीर आजारांचे संकेत देतात. 

टाचदुखी

जर तुमची टाच सतत दुखत असेल किंवा तुमचे पाय सुन्न होत असतील तर तुम्हाला डाबेटीजची तपासणी करून घेतली पाहिजे. अशावेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पायात मुंग्या येणं हे देखील डायबेटीजचं लक्षण असू शकतं.

पाय सुजणं

जर तुमच्या पायांना सतत सूज येण्याची तक्रार जाणवत असेल तर तुम्हाला किडनी समस्या किंवा अशक्तपणाची तक्रार असू शकते. म्हणूनच. त्यामुळे जर तुम्हाला हे लक्षण दिसलं तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. 

पायाची नखं पिवळी होणं

जर तुम्हाला तुमच्या पायाची नखे पिवळी झाली असतील तर ते कॅन्सरसारख्या घातक आजाराचं लक्षण असू शकतं.

पायाचा अंगठा सूजणं

जर तुमच्या पायाला अंगठ्याला दिर्घकाळापासून सूज येत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात यूरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं आहे. जे सांधेदुखीच्या समस्येचं लक्षण असू शकतं.