Heart Attack Symptoms on Hands: सध्याच्या काळात केवळ वयस्कर व्यक्ती नव्हे तर तरूणांना देखील हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. ही समस्या वाढली की हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. ज्यामध्ये रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी या लक्षणांकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हृदयविकाराच्या झटका टाळायचा असेल तर त्याच्या लक्षणांकडे अधिक लक्ष द्या.
हृदयविकाराच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं केवळ छातीतच दिसत नाहीत, तर हाताच्या आसपासही दिसून शकतात. जाणून घेऊया हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हातामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची लक्षणं दिसून येतात.
हातावर सूज येणं हे देखील हृदयविकाराचा झटका येण्यास सूचित करू शकतं. हे एक अतिशय गंभीर लक्षण असू शकतं. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हाताला मुंग्या येणं या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. हे लक्षण देखील देखील हृदयविकाराचा झटका सूचित करू शकतं. ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना केवळ पाय आणि छातीभोवती अस्वस्थता जाणवत नाही. तर काही वेळा रूग्णांचे हातही सुन्न पडू शकतात. हृदयविकाराचा झटका आल्यास तुमचं हात सुन्न होऊ शकतात. अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांच्या डाव्या हातामध्ये खूप वेदना होऊ शकतात. जर तुम्हाला असा त्रास खूप होत असेल तर अशा परिस्थितीत एकदा तुमच्या आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यावी.
हात वारंवार थंड पडत असतील तर हृदयविकाराचा झटका येण्याचं हे लक्षणं मानलं जातं. जर तुमचे हात खूप थंड होत असतील तर एकदा डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरू शकतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)