सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा

तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.

Updated: Aug 14, 2017, 10:58 PM IST
सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा title=

मुंबई : कोणत्याही व्यक्तीने रिलेशनमध्ये एकदा  धोका खाल्ला असेल तर, दुसऱ्या वेळी कोणासोबत नाते जोडताना तो हजारदा विचार करतो. त्याचे कारण एकच की एकदा बसलेला विश्वासघाताचा तडाखा परत बसू नये. त्यामुळे प्रश्न हा निर्माण होतो की, पूढच्या वेळी कोणावर कसा विश्वास ठेवायचा. पण, तुम्ही निराश होऊ नका. काही अभ्यासकांनी आणि मनोवैज्ञानिकांनी संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. जे तुम्हाला रिलेशनमध्ये मार्गदर्शन करतील. प्रेमात धोका मिळण्याच्या बऱ्याचशा गोष्टी समान असतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा. तुमच्या पार्टनरच्या या बदललेल्या गोष्टीच तुमच्या रिलेशनसाठी धोक्याचा इशार असतो.

अमेरिकेतील काही अभ्यासकांनी अभ्यास करून मांडलेल्या काही निष्कर्षानुसार, जे लोक आपल्या पार्टनरपेक्षा आर्थिक कमाई अधिक करतात त्यांच्याकडून धोका मिळण्याची अधिक शक्यता असते. पण, अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की, जे लोक आपल्या पार्टनरपेक्षा कमी कमावतात तेही धोका देऊ शकतात. यासाठी अभ्यासक उपाय सुचवतात की, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मित्रांसी मैत्री वाढवा. आपल्या किंवा पार्टनरच्या मित्रांकडून आपल्या पार्टरच्या विश्वासार्हतेबाबत माहिती जमा करा. त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. कितीही सुसंवाद झाला. तो तुम्हाल आवडला तरी, त्याच्यावर पटकण विश्वास ठेऊ नका.
अभ्यासक म्हणतात की, जे लोक पटकण कोणाच्या प्रभावाखाली येत नाहीत. तसेच, एखादी व्यक्ती आवडल्यास गळेपडूपणा करत नाहीत अशा व्यक्ती विश्वासाला अधिक पात्र ठरतात. जर पार्टनर एकलकोंडा असेन, त्याला जास्त मानसांत रमायला आवडत नसेल तर, असे पार्टनरही धोका देऊ शकतात.
अर्थात अभ्यासकांनी अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले असले तरी, या केवळ शक्यता आहेत. त्यामुळे व्यक्तिपरत्वे अनुभव वेगळा असू शकतो. त्यामुळे पटकण आपण कोणत्याही व्यक्तीबाब अनुमान काढू शकत नाही. त्यासाठी काही काळ जावाच लागतो.