मुंबई : तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का? परंतु, आरोग्यासाठी फक्त धूम्रपान करणे हानिकारक नाही. तर काही दैनंदिन सवयी ज्या धूम्रपान कारण्याइतक्याच घातक आहेत किंवा त्यामुळे आजरांचा धोका वाढतो. त्या सवयी कोणत्या आहेत जाणून घेऊया.
प्रोटीनयुक्त मांसाहारी पदार्थांमध्ये hormone IGF-1 मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कॅन्सर सेल्सच्या वाढीस चालना मिळते. अभ्यासानुसार जे लोक अधिक प्रमाणात प्रोटीनयुक्त मांसाहारी आहार घेतात विशेषतः मध्यम वयात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.
जरी सकाळी व्यायाम केला आणि दिवसभर नुसतं बसून राहिलात तरी आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अभ्यासानुसार इनअॅक्टिव्ह लाईफस्टाईल असलेल्या सुमारे १६ लाखांहून अधिक लोकांना दरवर्षी लंग प्रोस्टेट आणि कोलन कॅन्सर होतो.
अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की सोयाबीनचे तेल अधिक तापवल्यास त्यातून aldehydes, particulate matter आणि polycyclic aromatic hydrocarbons ची निर्मिती होते. हे सगळे घटक सिगरेटमध्ये असतात. त्यामुळे तेलाची निवड काळजीपूर्वक करा. ऑलिव्ह ऑईल आणि सोयाबीनचे तेल हे अधिक तापवल्यास हानिकारक ठरेल.
जर तुम्ही नैसर्गिक गॅसवर अन्नपदार्थ शिजवत असाल तर तुम्हाला नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि formaldehyde यांचा सामना करावा लागेल. अभ्यासानुसार या घटकांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून अशावेळी चिमणी किंवा vent hood चा वापर करा.
पुरेशी झोप मिळाल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, धूम्रपानामुळे झालेल्या मृत्यचे प्रमाण हे झोप न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्युदराइतकेच आहे.