गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्यांनी करून घ्यायला हव्यात 'या' तपासण्या

लग्नानंतर अनेक कपल प्लानिंग करतात. अशावेळी गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी काही टेस्ट करे गरजेचे असते. त्याबाबत डॉ. शिवा मुरारका, ज्येष्ठ शास्त्रज्ञ-प्रजनन जीनोमिक्स, न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन यांनी दिली माहिती. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 7, 2024, 04:13 PM IST
गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्यांनी करून घ्यायला हव्यात 'या' तपासण्या title=

गरोदरपणाचा विचार करण्यापूर्वी, महिलांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गर्भधारणापूर्व काळजी ही आई आणि बाळ दोघांसाठी निरोगी गर्भधारणा आणि इष्टतम परिणाम सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.सर्वसमावेशक गर्भधारणापूर्व चाचणी केल्याने आरोग्य समस्या ओळखण्यात, संभाव्य जोखमींचे मूल्यांकन करण्यात आणि गर्भधारणेपूर्वी कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते. गरोदरपणाचा विचार करण्यापूर्वी स्त्रियांनी विचारात घ्याव्यात अशा काही आवश्यक तपासण्यांची माहिती डॉ. शिवा मुरारका, ज्येष्ठ शास्त्रज्ञ-प्रजनन जीनोमिक्स, न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन यांनी सांगितली आहे.

गर्भधारणापूर्व समुपदेशन: विशिष्ट चाचण्या घेण्याआधी, स्त्रियांनी त्यांच्या आरोग्य सल्लागारा बरोबर एक गर्भधारणापूर्व समुपदेशन सत्र आयोजित करावे. या सत्रामध्ये वैयक्तिक वैद्यकीय इतिहास, जीवनशैलीचे घटक, कौटुंबिक इतिहास आणि गर्भधारणे संबंधित गुंतागुंतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन केले जाते. यामध्ये चिंतेचे निराकरण, पुनरुत्पादक उद्दिष्टांवर चर्चा आणि वैयक्तिकृत गर्भधारणापूर्व काळजी योजना तयार करता येते. 

फॉलिक ऍसिडचे प्रमाण: गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात फॉलिक ऍसिडचे पुरेसे सेवन हे न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी आणि गर्भाचा निरोगी विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. फॉलीक ऍसिडच्या पातळीची चाचणी केल्याने महिलांना या आवश्यक पोषक घटकांचे पुरेशी पूरक आहार मिळत असल्याचे समजते.

अस्तित्त्वात असलेले आजार: मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड विकार किंवा स्वयंप्रतिकार रोग यांसारख्या आजार असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यांकन आणि ऑप्टिमायझेशन केले पाहिजे. यामध्ये रक्तातील साखरेची पातळी, थायरॉईडचे कार्य किंवा गर्भधारणेदरम्यान दीर्घकालीन आजारांना नियंत्रित करण्यासाठी औषधांतील बदल यांचा समावेश असू शकतो.

लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) साठी तपासण्या : गर्भधारणेपूर्वी एचआयव्ही, सिफिलीस, गोनोरिया, ट्रेपोनेमा, क्लॅमिडीया, हिपॅटायटीस बी आणि इतर लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) तपासण्या करून घ्याव्यात. उपचार न केलेले लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) माता आणि गर्भाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. ज्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, जन्मतः कमी वजन किंवा नवजात संसर्ग यासारख्या समस्या होऊ शकतात.

कॅरियर स्क्रीनिंग:  कॅरियर स्क्रीनिंग मध्ये एखाद्या व्यक्ती मध्ये काही आनुवंशिक आजार आहेत का याची तपासणी केली जाते. यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल रोग, थॅलेसेमिया, टे-सॅक्स रोग आणि स्पाइनल मस्क्यूलर ऍट्रोफी यासारख्या आजारांसाठी तपासणी केली जाते. दोघांची तपासणी केल्याने दोघांमध्ये एकाच आजाराची शक्यता आहे का हे समजते. ज्यामुळे होणाऱ्या बाळाला तो आजार होण्याची शक्यता वाढते. कॅरियरच्या आरोग्याची माहिती समजल्याने जोडपे गर्भधारणेसाठी प्रीप्लांटेशन अनुवांशिक चाचणीसह इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) किंवा गर्भधारणेदरम्यान प्रसूतीपूर्व चाचणी यासारख्या पर्यायांचा विचार करू शकते

जेनेटिक कॅरियर स्क्रीनिंग:  जेनेटिक कॅरियर स्क्रीनिंग मध्ये संततीला अनुवांशिक विकार होण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन केले जाते. ते विशिष्ट अनुवांशिक विकाराचा इतिहास असलेल्या कुटुंबाशी किंवा अशा व्यक्तींशी निगडीत आहे ज्यांच्या वंशात अनुवांशिक विकार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल रोग, टाय-सॅक्स आणि थॅलेसेमिया सारख्या रोगांच्या तपासण्या समाविष्ट असू शकतात. 

गुणसूत्र असामान्यता संबंधित तपासणी: डाउन सिंड्रोम (ट्रायसोमी 21) सारख्या गुणसूत्र असामान्यता, ज्या विकासातील अडचणी आणि जन्मजात दोष विषयी सर्वात सामान्य अनुवांशिक कारणांपैकी एक आहेत.नॉन-इनवेसिव्ह प्रीनेटल स्क्रीनिंग (एनआयपीएस) किंवा सेल-फ्री फेटल डीएनए चाचणी मातेच्या रक्तातील गर्भाच्या डीएनएचे विश्लेषण करून गुणसूत्रातील असामान्यतातपासता येतात. सामान्यत: गर्भधारणे दरम्यान केल्यास, जोडपे गर्भधारणेपूर्वी गुणसूत्र असामान्यता असण्याची शक्यता आहे का हे पाहण्यासाठी गर्भधारणापूर्व तपासणीचा पर्याय निवडू शकतात.
या महत्वपूर्ण चाचण्या केल्याने आणि गर्भधारणापूर्व काळजी घेतल्याने, स्त्रिया त्यांच्या निरोगी गर्भधारणेची आणि बाळंतपणाची शक्यता वाढवू शकतात. संभाव्य जोखीम घटक वेळेत लक्षात आल्याने आणि आरोग्य समस्यांचे सक्रिय व्यवस्थापन सकारात्मक गर्भधारणेचा अनुभव आणि निरोगी बाळाच्या जन्मात योगदान देते.गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांसाठी वैद्यकीय सल्लागाराच्या मदतीने वैयक्तिक गर्भधारणापूर्व काळजी योजना तयार करणे ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे