शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' Juices चं करा सेवन... उन्हाळ्यात होईल चांगला फायदा

How to Detox Body: आता सध्याचा जमाना हा इंटरनेटचा आहे. तेव्हा आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी असे अनेक ज्यूसही आपण व्हिडीओमार्फत पाहू शकतो आणि घरच्या घरीही त्याच्या रेसिपीज करू शकतो. परंतु तुम्ही या काही पेयांचा वापर आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करू शकता. 

गायत्री हसबनीस | Updated: May 31, 2023, 10:24 PM IST
शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' Juices चं करा सेवन... उन्हाळ्यात होईल चांगला फायदा title=
फाईल फोटो

How to Detox Body: सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यातून आपल्यालाही आपली बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्यासाठी कोणते ज्यूस फायदेशीर ठरतील यावरही आपल्याला शोध घ्यावा लागतो. आपण अनेकदा यासाठी आपल्या डाएटटिशनची मदत घेतो. आजकाल सगळ्यांचेच रूटिन हे पॅक असते त्यामुळे आपल्यालाही फार दगदग होते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लेक्ष करतो परंतु आरोग्यावर दुर्लेक्ष करून या काळात तरी चालणार नाही कारण सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यातून सध्या गर्मीचे दिवस आहेत. सोबतच आपल्याला आपल्या शरीराला शुद्ध करणेही अत्यंत गरजेचे असते. तेव्हा चला तर पाहूया की तुम्हा उन्हाळ्यात तुमची बॉडी डिटॉक्स कशी कराल?

आता सध्याचा जमाना हा इंटरनेटचा आहे. तेव्हा आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी असे अनेक ज्यूसही आपण व्हिडीओमार्फत पाहू शकतो आणि घरच्या घरीही त्याच्या रेसिपीज करू शकतो. परंतु तुम्ही या काही पेयांचा वापर आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करू शकता. तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराला चांगला थंडावाही मिळेल आणि शरीर साफही होऊन जाईल. शक्यतो उन्हाळ्यात थंड साखर किंवा सोडा असलेली पेय सारखी सारखी पिऊ नका त्यानं तुमच्या शरीरावर विपरित परिणामही होऊ शकतो. 

1,  नारळाचे पाणी - नारळाचे पाणी हे केव्हाही चांगले. तुम्हाला तुमच्या शरीराला आराम आणि थंडावा हवा असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्याच. या अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. सोबतच तुमची बॉडी ही डिटॉक्सही होते. दिवसातून दोनदाही तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यातून तुमची पचनक्रियाही सुधारते. त्यातून तुमच्या शरीरातील घाणही निघून जाते. तुमच्या आरोग्यासाठीही ते गुणकारी असते. 

2. भोपळ्याचा रस - तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी भोपळ्याचा रस हा कधीही गुणकारी ठरेल. याचे सेवन केल्यानं तुम्हाला चांगला आराम मिळेल. तुम्ही हे रिकाम्या पोटीही घेऊ शकता. 

3. भाज्यांचा रस - हा रस आपल्यासाठी कधीही चांगला ठरले कारण यात अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. बीटरूट, काकडी, गाजर, टॉमेटो, गाजर अशा फळभाज्या आणि पालेभाज्यांपासून बनवलेले ज्यूस हे तुम्हाला तुमचे शरीर डीटॉक्स करण्यात मदत करतात. 

हेही वाचा  - Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक

सध्या असे अनेक शॉप्स असतात जिथे तुम्हालाही हे ज्यूस उपलब्ध होतात. तेव्हा कोल्डड्रींक्स पिण्यापेक्षा तुम्ही या काही ज्यूसचा चांगला उपयोग करून घेऊ शकता.