मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात फीट राहणं खूप गरजेचं आहे. मात्र यासाठी प्रत्येकाकडे व्यायामासाठी तसंच जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ असेलच असं नाही. त्यामुळे अशा बऱ्याच व्यक्ती आहे जे ट्रेनरशिवाय घरी व्यायाम करतात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही असं करत असताना तुमच्याकडून काही चुका होत आहेत. अशा चुकांमुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं.
नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून शरीराला कोणतीही हानी होणार नाही. जाणून घेऊया अशा स्थितीत कोणत्या चुका करणं टाळावं.
पहिल्यांदाच ट्रेनरच्या मदतीशिवाय घरी व्यायाम करताना लोक अनेक चुका करतात. ट्रेनरच्या मदतीशिवाय वर्कआउट करत असताना, लोक पहिल्यांदा खूप भारी वर्कआउट्सने सुरुवात करतात. सुरुवातीला हलका व्यायाम करावा. या काळात तुम्ही वेट लिफ्टिंग किंवा इतर कोणताही व्यायाम करू नये.
काही लोक वर्कआऊट केल्यानंतर कूल-डाउन व्यायाम करतात. कूल डाउन व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. याचा सराव वगळल्याने तुमच्या स्नायूंना नुकसान होण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउटनंतर कूल डाउन व्यायामाचा नियमित केला नाही तर तुम्हाला श्वास घेण्यामध्ये काही प्रमाणात त्रास जाणवू शकतो.
बरेचदा लोक ट्रेनरशिवाय घरी वर्कआउट करताना ब्रेक घेत नाहीत. मात्र तुम्हाला माहितीये का, असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही दररोज 1 तास वर्कआउट किंवा व्यायाम करत असाल तर या काळात तुम्ही समान अंतराने 5-5 मिनिटांचे 3 ब्रेक घेतले पाहिजेत. 1 तासाच्या वर्कआउट रूटीनमध्ये 15-मिनिटांचा ब्रेक घेणं आवश्यक आहे.
घरी वर्कआऊट किंवा व्यायाम करताना, लोक सहसा रूटीन फॉलो करत नाही. असं केल्यामुळे त्यांना व्यायामाचा पूर्ण फायदा मिळत नाही.