मुंबई : लठ्ठपणा म्हणजेच स्थूलता एक अशी समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक लोक चिंतेत असतात. बहुतेक लोक त्यांच्या बेली फॅट म्हणजेच त्यांच्या पोटाला असलेल्या चरबीने कंटाळले आहेत. बेली फॅट कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारच्या टिप्सचा अवलंब करतात, परंतु काही केल्या बेली फॅट कमी होत नाही.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट वाढण्याचं कारण. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या चरबी लवकर वाढू लागते. जेणेकरून तुम्ही तुमची ही चूक सुधारून लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हेल्दी आणि फीट राहण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाचा तुमच्या दररोजच्या रूटीनमध्ये समावेश करणं गरजेचं आहे.
एका संशोधनानुसार, केवळ अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणाची कारणं नसून झोपेची कमतरता हे देखील त्यामागील एक मोठे कारण आहे. जर तुम्ही वेळेवर झोपला नाहीत तर तुम्ही स्थूल होण्याची शक्यता अधिक वाढते. चांगली झोप न घेण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाची चरबी वाढू लागते.
चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, दिवसाच्या कोणत्याही वेळी झोपणं योग्य आहे.
ज्या व्यक्ती रात्री उशिरा झोपतात किंवा कमी झोप घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. रात्री 10 वाजता झोपल्यास लठ्ठपणाचा धोका कमी असतो. तुम्हाला चांगली झोप घेण्यासोबतच रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी लागेल, जेणेकरून स्थूलता वाढणार नाही.