Belly Fat वाढण्यामागे 'या' 3 सवयी आहेत कारणीभूत

बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या वैयक्तिक सवयी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Updated: Jul 21, 2022, 07:12 AM IST
Belly Fat वाढण्यामागे 'या' 3 सवयी आहेत कारणीभूत title=

मुंबई : बेली फॅट कमी करण्याच्या टिप्स जाणून घेण्यापूर्वी हे फॅट वाढण्याची कारणं जाणून घेतली पाहिजे. पोटाची चरबी वाढवणाऱ्या या सवयी जर तुम्ही दूर केल्या नाहीत, तर तुम्ही कितीही वजन कमी करण्यासाठी आटापिटा केला तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. 

तुमच्या दैनंदिन जीवनातील या वैयक्तिक सवयी तुमच्या पोटाची चरबी वाढवतात. बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या वैयक्तिक सवयी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

स्ट्रेसमध्ये खाणं

काही लोकांना ताणतणाव असताना प्रचंड भूक लागते. याला स्ट्रेस इटींग किंवा इमोशनल इटींग म्हणतात. या काळात, लोक जास्त फॅट असलेलं आणि साखरयुक्त पदार्थ खातात, ज्यामुळे पोटाची चरबी वाढू शकते.

सतत खाणं

जेंव्हा तुम्ही काहीही खाता त्यावेळी ते शरीराला ते पचायला वेळ लागतो. मात्र काही लोकं कमी वेळेत जास्त वेळा खातात. त्यामुळे पचनसंस्थेला फॅटचा योग्य वापर करता येत नाही. हे फॅट शरीरावर जमा होऊ लागतं. परिणामी बेली फॅट वाढतं. 

रात्री-अपरात्री खाणं

बेली फॅट कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्यावं. कारण रात्री उशिरा किंवा झोपण्यापूर्वी अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नाही. हे चरबी बनून शरीरावर जमा होऊ लागतं. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागतं.