Benefit of banana health: रोज 1 केळं खाल्ल्याने होऊ शकतात बरेच फायदे

फळांमध्ये अधिक एनर्जी देणारं फळ म्हणजे केळं

Updated: Aug 4, 2021, 05:18 PM IST
Benefit of banana health: रोज 1 केळं खाल्ल्याने होऊ शकतात बरेच फायदे title=

मुंबई : फळांमध्ये अधिक एनर्जी देणारं फळ म्हणजे केळी. केळ्याचं वैशिष्ट म्हणजे इतर फळांच्या तुलनेत केळं स्वस्त मानलं जातं. केळ्यामध्ये विटॅमीन, प्रोटीन आणि इतर पोषक घटक असतात.  जर तुम्हाला कमजोरी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात केळ्याचा समावेश करू शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक केळ्यामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी 6, थायमिन, रिबोफ्लेविन देखील असतात. केळ्यात 64.3 टक्के पाणी, 1.3 टक्के प्रथिने, 24.7 टक्के कार्बोहायड्रेट हे देखील प्रमाण आढळतं.

काय म्हणणं आहे डाएट एक्पर्ट्सचं

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, केळ्यामध्ये पोटॅशियम आढळतं, ज्यामुळे मसल्स क्रॅप्म्स येत नाहीत. केळ्यात कार्बोहायड्रेट आढळतं, जे आपल्या शरीराला ऊर्जा देतं आणि आपल्याला कमी थकवा जाणवतो. जर तुम्ही व्यायामापूर्वी दोन केळी खाल्ली तर तुम्हाला व्यायामादरम्यान जास्त थकवा जाणवणार नाही.

दररोज एक केळ खाण्याचे फायदे

तणाव राहणार नाही

केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा घटक आढळतो. या ट्रिप्टोफॅनमुळे आपल्या शरीरात सेरोटोनिन तयार होतं. सेरोटोनिनला हॅप्पी हार्मोन्स देखील म्हणलं जातं. यामुळे तणाव दूर राहतो.

पचन योग्य पद्धतीने होतं

केळ्यातील स्टार्च नावाचा घटक आपल्या पचनसंस्थेसाठी महत्वाच्या असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी फायदेशीर असतो. केळं अंटी- अॅसिड असतं त्यामुळे तुम्हाला छातीत जळजळण्याची समस्या असेल तर केळीचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल.

वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत

केळ्यात भरपूर फायबर असतं. याव्यतिरिक्त, केळ्यामध्ये स्टार्च देखील आढळतो. जर तुम्ही नाश्त्यामध्ये केळं खाल्लं तर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. अशा प्रकारे वजन नियंत्रणात ठेवता येतं.

अशक्तपणा राहणार नाही

केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. हे खाल्ल्याने पोट लवकर भरतं. सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाताना नाश्ता करणं शक्य नसेल तर एखादं केळ खाऊन बाहेर पडा. यामुळे इंस्टेंट एनर्जी मिळते.