मुंबई : शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2,994 नवीन प्रकरणं नोंदवली गेली. दरम्यान कोरोनामुळे आजारामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला. या कालावधीत, हिमाचल प्रदेशात 191 नवीन प्रकरणं आणि जम्मू-काश्मीरमध्ये 101 नवीन संक्रमित आढळले आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कोरोनाची नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 79,98,673 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,47,971 वर पोहोचली आहे.
दरम्यान कोरोनामुळे गेल्या एका दिवसात मुंबई आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी दोन तर ठाणे, रायगड आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाची 191 नवीन प्रकरणं आढळून आली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 101 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 4,55,807 झाली आहे. केंद्रशासित प्रदेशात गेल्या एका दिवसात कोविड-19 मुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद नाही.