प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच यांनी सांगितलं Belly Fat कमी करण्याचं गुपित; जाणून घ्या

 कारण लवकरात लवकर फॅट बर्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

Updated: Aug 27, 2022, 02:01 PM IST
 प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच यांनी सांगितलं Belly Fat कमी करण्याचं गुपित; जाणून घ्या  title=
the only secret to fat loss and transforming your body into a fat burning and fat burn secret you should know trending news

Belly Fat: तरुणींसोबत आजच्या तरुणांना Belly Fatची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयी, अपुरी झोप या आणि अशा अनेक कारणांमुळे आपलं वजन झपाट्याने वाढतं. वजन जेवढ्या झपाट्याने वाढतं मात्र ते कमी करणं तेवढंच कठीण आहे. कोरोना महासंकटानंतर बहुतांश लोक हे आपल्या प्रकृतीबद्दल जागृत झाले आहेत. डाएट, जीम आणि अनेक घरगुती उपाय करुन लोक आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र अनेक वेळा हे सगळं करूनही वजन किंवा Belly Fat कमी होत नाही. अशावेळी आपण निराश होतो. 

थांबा मग निराश होण्याची गरज नाही. प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच ल्यूक कॉटिन्हो यांनी Belly Fat संदर्भात गुपित सांगितलं आहेत. कोच ल्यूक यांच्या मते अनेक जण एका डाएटवरुन दुसऱ्या डाएटवर शिफ्ट होतात. केटो ते लो-कार्ब ते हाय- प्रोटीन आणि व्हेजिटेरियनवरुन इंटरमिटेंट फास्टिंगवर जातात. कारण लवकरात लवकर फॅट बर्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. (the only secret to fat loss and transforming your body into a fat burning and fat burn secret you should know trending news )

कोच ल्यूक कॉटिन्हो यांच्या मते, आपल्या शरीरातील चरबी कमी कमी करायची आणि त्यासाठी कोणतं हार्मोन काम करतात, अशा गोष्टी आपण पहिले जाणून घ्यायला हवं. या माहितीच्या आधारे तुम्ही वजन कमी करण्यात यश मिळवू शकता. कोच आज असा उपाय सांगणार आहे तो सगळ्यांसाठी उपयुक्त नाही. 

मी आज तुम्हाला इन्सुलिनबद्दल सांगणार आहोत. कौटिन्हो म्हणतात की, जेव्हा लोक इन्सुलिनबद्दल ऐकतात तेव्हा ते लगेच टाइप 1 आणि 2 मधुमेहाचा विचार करतात. पण ते त्याहून अधिक आहे. इंसुलिनमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे कार्य आहे. हा हार्मोन रक्तातून ग्लुकोज सोडण्यासाठी आणि त्याचा ऊर्जा म्हणून वापर करण्यासाठी पेशींचे दरवाजे ठोठावतो, परंतु जर इन्सुलिनची पातळी वाढली असेल किंवा शरीर इन्सुलिन प्रतिरोधक असेल तर या पेशी रक्ताभिसरण दुर्लक्ष करतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. त्यामुळे इन्सुलिनची पातळी राखली पाहिजे, उच्च किंवा कमी नाही.

तुम्ही लेवल हेल्दी कसं ठेवणार? 

1. सतत खाऊ नका. जेव्हा तुम्हाला खरोखर भूक लागते तेव्हाच खा.

2. कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खा.

3. रात्री उशिरा आणि कार्बोहायड्रेटयुक्त जेवण हे आपत्तीसारखे आहे. यामुळे रात्रभर इन्सुलिनची पातळी जास्त राहील. जर तुम्हाला रात्री उशिरा जेवायचे असेल तर ते कमीत कमी ठेवा.

4. तुमची प्लेट प्रथिनांनी भरलेली पण कर्बोदके कमी करा. जास्त भाज्या खा.

5. सकाळी व्यायाम करा पण दिवसभर सक्रिय रहा. प्रत्येक जेवणानंतर 10 मिनिटं चाला.

6. तुमच्या झोपण्याच्या सवयी सुधारा आणि तुमची तणाव पातळी कमी करा. जर तुमची झोप कमी होत असेल किंवा तणाव असेल तर तुम्हाला साखर आणि कार्ब्स पदार्थ खाण्याची इच्छा होईल.  

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)