व्हेरिकोस व्हेन्स आजार होण्याची प्रमुख कारणे

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजार डोके वर काढत आहेत. त्यापैकी एक व्हेरिकोस व्हेन्स. 

Updated: Apr 19, 2019, 10:52 AM IST
व्हेरिकोस व्हेन्स आजार होण्याची प्रमुख कारणे  title=

मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजार डोके वर काढत आहेत. त्यापैकी एक व्हेरिकोस व्हेन्स. लोकांमध्ये व्हेरिकोस व्हेन्सची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नैसर्गिकरित्या उपचार पद्धतीने हा आजार नष्ट होण्याटी शक्यता आहे. व्हेरिकोस व्हेन्सचे दुखने फार त्रासदायक असते. व्हेरिकोस व्हेन्स या आजारामुळे मांसपेशिंमध्ये पायांमध्ये जाडपणा आल्याचे जाणवते, त्यामुळे चालताना त्रास होतो. व्हेरिकोस व्हेन्स होण्याची मुळ कारणे खालील प्रमाणे. 

फार काळ बसणे
फार काळ एकाच जागेवर बसल्याने व्हेरिकोस व्हेन्स होण्याची शक्यता आहे. एका जागेवर बसणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. एकाच जागी बसल्याणे शरीराची चरबी वाढते, त्याचबरोबर व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास सुद्धा वाढतो. त्यामुळे शरीराची होणे गरजेचे आहे. 

फार काळ उभे राहणे
काही लोकांच्या कामाच्या स्थळावर त्यांना एकाच जागी उभे राहण्याची गरज असते. एकाच जागी उभे राहिल्याने पायांवर ताण येतो. एकाच जागी उभे राहण्यापेक्षा थोडा थोडा वेळ हलचाल करा. 

हाय हिल्स
हिल्स घालणे मुलींसाठी फार आवडीचा विषय आहे, पण हे हाय हिल्स त्यांच्या आरोग्यावर बेतू शकतात. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या अडथळा येतो. 
त्यामुळे शक्य झाल्यास हिल्स घालने टाळा.

मिठाचा वापर
मिठाचा अति वापर केल्यास व्हेरिकोस व्हेन्स उद्भवण्याची शक्यता असते. रोजच्या आहारात मिठाचा वापर कमी केल्याने व्हेरिकोस व्हेन्सचा होण्याची शक्यता कमी असते. मिठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा त्रास रक्त वाहिन्यांना होतो. 

रोज किमान अर्धा तास फिरा. सकाळी फिरायला जाणे योग्य. त्यामुळे पायांच्या नसा मजबूत होतील. फायबरयुक्त आहाराचा समावेश करा. मैदा, फास्ट फूड खाणे शक्यतो टाळा. झोपताना पाय उंचावर ठेवा. यामुळे व्हेरीकोज व्हेंन्स विकसित होणार नाही द्राक्षाच्या बीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाने मालिश करा.