अतितणाव वजन वाढण्याचे कारण, म्हणून तणावापासून मुक्त होण्यासाठी उपाय

अर्धवट झोपेचा परिणाम केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो.

Updated: Jun 24, 2019, 02:47 PM IST
अतितणाव वजन वाढण्याचे कारण, म्हणून तणावापासून मुक्त होण्यासाठी उपाय title=

मुंबई : आजकालचे जीवन हे घडाळ्याच्या काट्यावर आधारलेले आहे. रोज सकाळी उठून ऑफिसला जावे लागते. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अर्धवट झोपेचा परिणाम केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते. पुरेशी झोप न झाल्यास तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात. यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. तसेच वजनही वाढण्याची शक्यता असते. 

- अफिसमधून आल्यानंतर सरळ जिमला जा अथवा घरी वर्कआऊट करा. रात्रीच्या वेळेस डंबेल्सने व्यायाम केल्याने पचन क्रियेचा वेग १६ तासांसाठी वाढतो. 

- जिम जाणाऱे नेहमी प्रोटीन शेक घेतात. 

- जिमवरुन आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील ब्राऊन फॅट कमी होण्यास मदत होते. 

- चहा, कॉफी घेण्याऐवजी ग्रीन टी घ्या. दिवसातून तीन वेळा ग्रीन टी घेतल्यास रात्रभरात ३.५ टक्के कॅलरीज बर्न होतात. 

- रात्री थंडावा असलेल्या खोलीस झोपल्याने कॅलरीज बर्न होतात. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.