Harmful Realtionship : 'या' 4 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा, नाहीतर तुम्हाला उध्वस्त करतील

आयुष्याच्या प्रवासात अनेकदा चांगली माणसं भेटतात जी आपली खूप मदत करतात आणि आपल्या एक नवा मार्ग दाखवून जातात. 

Updated: Aug 9, 2022, 07:49 PM IST
 Harmful Realtionship  : 'या' 4 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा, नाहीतर तुम्हाला उध्वस्त करतील title=

मुंबई : आयुष्याच्या प्रवासात अनेकदा चांगली माणसं भेटतात जी आपली खूप मदत करतात आणि आपल्या एक नवा मार्ग दाखवून जातात. म्हणूनच अशा लोकांना कधीही विसरता येत नाही. पण या उलट सुध्दा काही लोकं अशी असतात की, केवळ आपल्याला जणू त्रास द्यायलाच आलेली असतात. अशी लोकं आपल्या मनात तिरस्कार निर्माण करतात. त्यामुळे अशी लोक आयुष्यात लांब ठेवलेली बरी. पण अशी माणसं ओळखायची कशी? आणि हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Harmful Realtionship)

सेल्फ-ऑबसेस्ड

काही लोक नेहमी दुसऱ्यांकडून सहानुभूतीची अपेक्षा करतात आणि आपणच किती ग्रेट आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचे जग केवळ त्यांच्या पुरती मर्यादित असते. त्यामुळे बाकी लोकांशी त्यांना काही देणे घेणे नसते. तसेच काहीजण खूप जास्त सेल्फ-ऑबसेस्ड असतात आणि त्यांचे जग हे केवळ त्यांच्या भोवतीच असते. अशा लोकांना नार्सिसिस्ट म्हटले जाते. परिणामी असे लोक तुमच्यात खूप निगेटिव्हिटी निर्माण करून तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतात.

ड्रामेबाज लोक

ज्या व्यक्तींना आयुष्यात खूप जास्त ड्रामा आवडतो अशा व्यक्तींपासून चार हात लांबच राहा. असे लोक प्रत्येक गोष्टीत स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक स्वत: ड्रामा करतात आणि त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. त्यामुळे असे लोक जर तुमच्या आयुष्यात असतील तर आताच 100 हात लांब ठेवा. जेणेकरून तुमचं सुंदर आयुष्य उध्दस्त करणार नाही. 

अँटीसोशल लोक 

अँटीसोशल लोक हे सर्वात जास्त घातक समजले जात असून अनेकदा त्यांचा स्वत: वरचा कॅट्रोल राहत नाही. त्यामुळे ते इतरांना गृहीत धरू लागतात. अशा लोकांसोबत राहून आपल्यात देखील ती एकटेपणाची भावना निर्माण होते. अशा लोकांसोबत राहिल्याने आत्मविश्वास पूर्णपणे आपण गमवू शकतो. तसेच असे लोक अनेकदा जगासमोर आपला अपमान करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. एवढेच नाही तर चुकीचा ब्लेम सुद्धा तुमच्यावर टाकू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सुद्धा दूर राहा.   

जे लोक नेहमी तणावात असतात
 काही लोक खूपच आक्रमक असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल असुरक्षित वाटते. ते त्यांच्या भूतकाळातील गोष्टी आणि त्यांचे जुने वैर कधीच विसरत नाहीत. अशा लोकांना वाटते की संपूर्ण जग त्यांच्या मागे आहे असे वाटत असते. त्यामुळे जे लोक नेहमी तणावात असतात अशा लोकांपासून लांबच राहा. 
 
वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती

काही लोकांना इतरांवर वर्चस्व गाजवण्याची सवय असते. अशा लोकांसोबत तुम्ही अनेकदा तुमचा आत्मविश्वास गमावून बसता आणि तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो. असे लोक बहुधा सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करू लागतात. अशा लोकांच्या पडझडीला मर्यादा नसतात, परंतु ते चोरी करून एखाद्याला मारण्यापर्यंत देखील जाऊ शकतात.