फिनलंड : संशोधकांनी शोधली कोरोनाचा (coronavirus) छडा लावणारी अंगठी. (smart ring monitors temperature) लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे. आजारावर उपचारांपेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणं कधीही चांगलं, असं म्हणतात. तसेच आजाराचे लवकर निदान झाले तर उपचार करणं अधिक सोपं जातं. त्यामुळं आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशीच एक स्मार्ट अंगठी (smart ring) संशोधकांनी शोधली आहे. नेमकी कशी उपयोगी ठरते ही अंगठी, पाहूयात.
तुम्हाला ताप आलाय का?
तुम्ही आजारी आहात का?
तुम्हाला कोरोनाची बाधा झालीय का?
'स्मार्ट अंगठी' करणार निदान.
कोरोनाच्या संसर्गापासून वाचायचं असेल तर ही स्मार्ट अंगठी घाला. (smart ring monitors temperature) ही कुणा भोंदू बाबा-बुवानं दिलेली मंतरलेली अंगठी नाही... तर संशोधकांनी सातत्यानं प्रयोग करून ही स्मार्ट अंगठी तयार केलीय. ही अंगठी बोटात घातल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची प्राथमिक अवस्थेतच माहिती मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
- ही स्मार्ट अंगठी शरीरातील तापमानाची नोंद ठेवते.
- थर्मामीटरपेक्षा चांगलं निदान स्मार्ट अंगठी करते
- त्यामुळं वेळीच कोरोना तपासणी करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे सोपं होते
- तापाची इतर लक्षणं असतील तरी रोगाचं निदान करता येते.
असा दावा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी केला आहे.
कोरोनासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे, यासाठी फिनलंडमधल्या ऑरा कंपनीनं ही स्मार्ट अंगठी तयार केलीय. ही अंगठी एका मोबाईल अॅप्लिकेशनशी कनेक्ट केलेली असते. या अॅप्लिकेशनमध्ये तुम्हाला शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, श्वसनाचा वेग अशी माहिती नोंदवली जाते.
अमेरिकेतील सुमारे ३ हजार ४०० आरोग्य सेवकांना ही ऑराची स्मार्ट अंगठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात आली आहे. त्याशिवाय जगभरातील ६५ हजार लोकांनी अंगठीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. मग तुम्ही देखील घेणार ना ही स्मार्ट अंगठी?