प्रेग्नेंसी नाही रोखणार पण असे कंडोम ज्याची उपयुक्तता तुम्हांला हैराण करेल...

  तुम्ही रोज टीव्ही, वर्तमानपत्रापासून बॅनर आणि पोस्टरवर कंडोमची जाहिरात आणि त्याचे फायदे पाहतात. प्रत्येक कंपनी आपआपल्या उत्पादनाची उपयुक्तता सांगत असते. पण आता असे एक कंडोम बाजारात आले आहे की ते या सर्वांपेक्षा वेगळे आहे. 

Updated: Dec 29, 2017, 05:32 PM IST
 प्रेग्नेंसी नाही रोखणार पण असे कंडोम ज्याची उपयुक्तता तुम्हांला हैराण करेल... title=

नवी दिल्ली :  तुम्ही रोज टीव्ही, वर्तमानपत्रापासून बॅनर आणि पोस्टरवर कंडोमची जाहिरात आणि त्याचे फायदे पाहतात. प्रत्येक कंपनी आपआपल्या उत्पादनाची उपयुक्तता सांगत असते. पण आता असे एक कंडोम बाजारात आले आहे की ते या सर्वांपेक्षा वेगळे आहे. 

हा कंडोम प्रेग्नेंस रोखण्यासाठी मदत करत नाही, पण याची उपयुक्तता तुम्हांला रोमांचित करेल. पण तुमचा एक प्रश्न असेल की हे कंडोम प्रेग्नेंसी थांबवत नाही मग त्याचा फायदा काय? 

किती कॅलरी बर्न झाली सांगणार 

हे स्मार्ट कंडोम युजरची सेक्स लाइफ इम्प्रूव्ह करण्यासाठी इंटीमेट डाटा कलेक्ट करते.
i.con या नावाने हे स्मार्ट कंडोम बाजारात उपलब्ध होणार आहे. युजर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना त्याचा परफॉर्मन्स तो मोबाईलवर रिफ्लेक्ट होणार आहे.  हे एक प्रकारचे गॅजेट आहे. टेक मार्केटमध्ये याला गेम चेजिंग डिव्हाइस म्हणून पाहिले जात आहे. तुम्ही तुमच्या साथीदारासह इंटीमेट होताना या कंडोमचा वापर करतात त्यावरून तुम्हांला लक्षात येईल की शरीर संबंधावेळी किती कॅलरी बर्न झाली. 

अॅपच्या माध्यमातून मोबाईलशी कनेक्ट होणार 

कंडोम एका अॅपच्या माध्यमातून मोबाईलशी कनेक्ट होणार आहे. यातील आकडे तुम्हांला तुमचा स्पीड, किती वेळ इंटरकोर्स झाला, कोणत्या पोझिशनमध्ये केला. यात एक रिंग सारखे डिव्हाइस आहे. त्याला कंपनीने स्मार्ट कंडोम नाव दिले आहे. पुरूषांनी हे परिधान करायचे आहे. 

रिअल टाइम डाटा मिळणार

यात तुम्हांला इंटरकोर्स दरम्यान रिअल टाइम डाटा मिळणार आह. कंडोम बनविणाऱ्या कंपनीचा दावा आहे की यात तुम्हांला परफॉर्मन्सची माहिती मिळेल तशी कोणत्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स कमी होता. हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे. त्यामुळे या कंडोममुळे तुम्हांला मिळणारी वैयक्तीक माहिती  वैवाहिक जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी मदत करू शकते. 

जानेवारीपासून होणार विक्री 

i.con बनविणाऱ्या एका ब्रिटीश कंपनीचा प्रवक्त्याने सांगितले की, याचा विक्री जानेवारी २०१८ पासून होणार आहे. आतापर्यंत ९ लाख लोकांनी या गॅजेटमध्ये आपला इंटरेस्ट दाखवला आहे. याची किंमतबद्दल बोलायचे झाले. सध्या ५९.९९ युरो म्हणजे ४५८१ रुपये आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की वेरिएबल टेक्नोलॉजीचे पुढची पायरी आहे. 

असे करणार काम 

स्मार्ट कंडोममध्ये एक नॅनो चिप आणि ब्ल्यूटूथ देण्यात आले आहे. ब्ल्यूटूथच्या माध्यामातून तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यात आलेल्या अॅपशी कनेक्ट होणार आहे. डिव्हाइस यूज करण्यासाठी याला परिधान करून ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट करावे लागणार आहे. हे वॉटरप्रूफ डिव्हाइस आहे. वजनाने हलके आहे तसेच आकाराने रबराच्या रिंग प्रमाणे आहे.