Sleep During Study: अभ्यास करताना झोप लागते? आळस नव्हे, 'ही' आहे खरी समस्या; जाणून घ्या सविस्तर

Why We Sleep During Study: तुम्हाला अभ्यास करता करता झोप लागते का, नाही असा विचार करू नका की तुम्ही आळशी (Lazy) आहात. ही एक समस्या असून यामागे सोबतच एक रंजक शास्त्रीय कारणंही आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, ही समस्या कशी आहे आणि कोणत्या व्यक्तींना (Which type of People Sleeps While Studying) यात झोप लागते? 

Updated: Mar 20, 2023, 09:06 AM IST
Sleep During Study: अभ्यास करताना झोप लागते? आळस नव्हे, 'ही' आहे खरी समस्या; जाणून घ्या सविस्तर title=
Sleeping in Study what are the scientific reasons behind the sleep we get while studying for long time

Why We Sleep While Studying: लहान मुलं अभ्यासाला बसली की त्यांच्यामागे सीसीटिव्ही कॅमेरा लागलेला असतो तो (Exam Pressure) म्हणजे आई वडिलांचा. ते योग्य प्रकारे अभ्यास करत आहेत की नाही याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. त्यांना जरा कुठे डुलकी लागली की आई वडिल धावत येतात आणि लहान मुलांना चांगलीच तंबी देतात. हे काय फक्त लहान मुलांच्याच बाबतीत घडत अशातला प्रकार नाही तर शाळेतील किशोरवयीन अन् कॉलेजमधील मुलांनाही याचा (Sleeping While Studying) त्रास सहन करावा लागतो. परंतु पालकांनी आणि सोबतच विद्यार्थ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की नक्की अभ्यास करताना झोप लागतेच का? हो, हे जाणून घेणे जितकं महत्त्वाचे आहे तितकेच ते रंजकही आहे. अभ्यास करताना झोप (Why We Sleep While Studying) लागण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. 

कोणी अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना मध्यचे झोपलं तर आपण काय म्हणतो, अरे हा तर किंवा ही तर किती आळशी आहे! असं लेबल लावून आपण मोकळं होतो. परंतु जरा विचार केलाय का की, त्या व्यक्तीला नक्की अभ्यास करताना झोप का लागत असेल? हा विचार तुम्ही नक्कीच केला नसेल कारण आपण अशावेळी एवढा गंभीर विचार करत नाही. परंतु तुम्हाला यामागचं कारण जाणून घेऊन नक्की आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया की अभ्यास करताना झोप लागण्यामागचं नक्की कारण (Scientific Reason Behind Sleeping in Study) आहे तरी काय? 

काय आहे शास्त्रीय कारणं? 

यामागे एक रंजक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण अभ्यास करायला सुरूवात करतो तेव्हा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करतो. डोळ्यांचा वापर या प्रक्रियेत सर्वाधिक होत असल्यानं जेव्हा आपण जास्त वेळ अभ्यास करून थकतो तेव्हा आपल्या मेंदूला आपोआप संकेत जातात. जेव्हा जास्त वेळ अभ्यास करून आपले डोळे थकल्यानंतर त्यांच्यावर जास्त ताण पडतो आणि आपल्या डोळ्यातील मांसपेशी या शिथिल होऊ लागतात. तेव्हा आपला मेंदूचं यापुढे अजून वाचन तुमच्याकडून होऊ शकणार नाही याचे संकेत देतो.

कोणत्या व्यक्ती अभ्यास करताना झोपतात?

आपल्यापैंकी अनेक जणांना झोपेचा त्रास होत असेल तर काही जणांना जास्त वेळ झोप लागत असेल अथवा काही जणांना कमी झोप लागत असेल तर अशा लोकांना अभ्यास करताना झोप लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. कामावर जाणाऱ्या लोकांचेही असे होऊ शकते पण यात प्रमाण कमी असते परंतु अभ्यास करायला बसलेल्या विद्यार्थ्यांना झोप लागण्याची शक्यता जास्त असते. 

या समस्येचे काय गंभीर परिणाम होतात? 

अभ्यास करताना झोप लागणं ही एक गंभीर समस्या आहे. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे याकडे लोकं टिंगळटवाळी म्हणून पाहतात आणि अरे तुला माहितीये आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा, मुलगी आहे ती ना अभ्यास करता करता झोपते... असं बोलून मित्र-मैत्रिणींमध्ये अन् घरी हा विषय फक्त गंमतीचा होऊन जातो. त्यातून आईवडिलही याकडे गांभिर्यानं पाहत नाहीत परंतु याचा गंभीर परिणाम मुलांवर होऊ शकतो. जसे की त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य ते उपाय करून या समस्येला (Sleeping in Study Problem) दूर करणे आवश्यक आहे. 

काय असतात उपाय? 

अशावेळी आपलं शरीर हे रिलॅक्स असते आणि फक्त डोळे आणि मेंदूच यावेळी काम करत असतो तेव्हा या क्रियेला प्रोत्साहन मिळू नये म्हणून कधी लोळत पडून अभ्यास करू नका. फक्त अभ्यास करतानाच नाही तर ही समस्या गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हर्समध्येही (Drivers Sleeping Problems) दिसून येते यामागेही शास्त्रीय कारणं तेच आहे.