५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब

हल्ली प्रदूषण इतकं वाढलंय की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, ब्लॅकहेडसारख्या समस्या सतावतात. ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होण्यास वेळ लागत नाही. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 7, 2017, 01:23 PM IST
५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब title=

मुंबई : हल्ली प्रदूषण इतकं वाढलंय की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, ब्लॅकहेडसारख्या समस्या सतावतात. ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होण्यास वेळ लागत नाही. 

ब्लॅकहेड्सचे मुख्य कारण हवा आणि मॉश्ररायझर आहे. जे ऑक्सिडाईज होऊन ब्राऊन कलरमध्ये रुपांतरित होते. यांनाच ब्लॅकहेड्स म्हणतात. अनेकदा हॉर्मोनमध्ये बदल, तणाव, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच तेलकट केसामुळे ब्लॅकहेड्स होतात. 

ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स यामधील फरक इतकाच आहे की ब्लॅकहेड्समध्ये रोमछिद्रे खुली असतात तर व्हाईटहेडमध्ये रोमछिद्रे बंद असतात. 

तुम्हालाही ब्लॅकहेड्ची समस्या आहे तर या घरगुती उपायाने तुम्ही समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

साहित्य - दोन चमचे मिंट टूथपेस्ट - रोमछिद्रे खुली करण्यास तसेच बॅक्टेरियांचा नाश करण्याचे काम मिंट टूथपेस्ट करते. ज्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतात. 

१ चमचा मीठ - मिठामध्ये नॅचरल अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे स्किन चांगली होण्यास मदत होते. 

आईस क्यूब - त्वचेची रोमछिद्रे बंद करण्यास बर्फाची मदत होते. 

कृती - एका वाटीत मिंट टूथपेस्ट आणि मीठ एकत्रित मिसळा. त्यानंतर हे मिश्रण नाकावर लावा. पाच मिनिटांनंतर थोड्याशा पाण्याने हलकासा मसाज करा. जेव्हा नाक स्वच्छ होईल तेव्हा आईस क्यूबने रगडा. यामुळे रोमछिद्रे बंद होण्यास मदत होईल.