श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. महिनाभर या महिन्यात अनेक उपवास केले जातात. अशावेळी थकवा येऊ नये म्हणून डाएटमध्ये करावा या पदार्थांचा समावेश करावा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 23, 2024, 03:19 PM IST
श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet  title=

श्रावण महिना हा भगवान शिवाचा महिना मानला जातो. सोमवार 5 ऑगस्टपासून हा महिना सुरू झाला असून गणेशोत्सवापर्यंत हा सुरु राहणार आहे.  बरेच लोक या महिन्यात शनिवारी, सोमवारी उपवास करतात. महिनाभर इतके उपवास करताना तुम्हाला तुमच्या डाएटची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महिनाभर असलेल्या या उपवासामुळे शरीरात बदल होत असतात. यामुळे शरीराला डिटॉक्स होते. 

उपवासा दरम्यान अनेकदा चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा येणे यासारख्या समस्या जाणवतात. याचे कारण आहे डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करणे. या पदार्थांमुळे शरीरात ताकद राहते. एक महिन्याचा उपवास करत असाल तर शरीरात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश आवर्जून करणे आवश्यक आहे. 

उपवास ठेवण्याचे फायदे 

उपवास करण्यामागे आध्यात्मिक हेतू तर आहेच सोबतच आरोग्यदायी फायदे देखील  असतात. संशोधनात असे सांगितले आहे की, फॅट बर्न करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी हा उपवास फार मदत करतो. यासोबत उपवासात कोलेस्ट्रॉल, हृदयाशी संबंधित आजार, हाय बीपीसारखे त्रासामध्ये देखील सकारात्मक बदल दिसतात. 

उपवासादरम्यान आपलं शरीर तासन् तास उपाशी राहते. अशावेळी पचनक्रिया सुधारते. संपूर्ण शरीराचे डिटॉक्स होते. एवढंच नव्हे तर वेटलॉससाठी देखील मदत होते. 

खिचडी 

उपवासादरम्यान तांदूळ आणि गहू असे पदार्थ टाळले जातात. मात्र या दिवसांमध्यये राजगिऱ्याचे पिठ, सिंघाड्याचे पिठ, यासारख्या पिठांसोबत इतर उपवासाचे पदार्थ देखील यामध्ये वापरु शकता. तसेच या पिठाच्या पुऱ्या, भजी, वडे देखील करु शकतात. तसेच खिचडी आणि चपात्या देखील बनवून खाऊ शकतात. 

उकडलेले बटाटे
उकडलेले बटाटे खाल्ल्याने चव चांगली लागते पण त्यात भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि सुस्त होऊ शकता. त्यामुळे बटाटे तळण्याऐवजी उकडून खाणे शरीरासाठी फायदेशीर. 

फळ

भरपूर फळे खा कारण ते केवळ तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरच देत नाहीत तर तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात.

कंदमूळे 

बटाटा,  रताळे, भोपळा, अरबी, शकरकंद या मूळ भाज्यांचा आहारात समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन बी, खनिजे आहेत.

दुग्धजन्य पदार्थ 

प्रथिने आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. यासाठी आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, ताक आणि चीज आणि तूप यांचा समावेश करावा..