Oral Health Tips in Marathi: रोज सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी दात घासणे महत्त्वाचे आहे. दातांची योग्य स्वच्छता होण्याकरीता दात घासावेत हे तर सर्वच जाणतात. फक्त दात घासणे तुमच्या तोंडासाठीच नाही तर आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. दातांवर जमा होणारे अन्नाचे कण आणि प्लाकचा थर नुसत्या बोटाने घालून निघत नाही त्यामुळं दात घासण्यासाठी टूथब्रश (ToothBrush Using Techniques) वापरणे योग्य आहे. डॉक्टरांच्या मते २-३ मिनिटांपर्यंत दातांना ब्रश करणे गरजेचे आहे. मात्र, रोज तुम्ही ब्रश करायच्या आधी एक चुकी करत आहात. या चुकीमुळं मौखिक आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. (teeth care routine)
दात घासण्याच्या आधी व ब्रशवर टूथपेस्ट लावण्याच्या आधी अनेक जण टूशब्रश ओला करतात तुम्ही पण ही चूक करतात का? तर वेळीच ही चूक थांबवा कारण असं करण्याने तुमचे मौखिक आरोग्य बिघडू शकते. डॉक्टरांनी याचे कारणही सांगितले आहे. तुम्ही टुथब्रश ओला केल्यावर त्याच्यावर टुथपेस्ट घेता त्यांने लवकर फेस निर्माण होतो. त्यामुळं टुथपेस्ट लवकर तोंडातून बाहेर येईल. त्याचबरोबर जोर-जोरात ब्रश करणे यानेही तुमचं मौखिक आरोग्य बिघडू शकते.
ब्रश ओला न केल्यास त्यावर लागलेली धुळ कशी साफ करायची असा प्रश्नही उपस्थित होतो. मात्र, यावरही तज्ज्ञांनी उपाय सांगितला आहे. टुशब्रशला धुळ लागण्यापासून वाचण्यासाठी दात घासल्यानंतर टुथब्रशला कॅप लावून ठेवा. जेणेकरुन त्यावर धुळ लागणार नाही.
ब्रश दिवसातून दोन ते तीनवेळा करावा. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपताना करायला हवा. दात घासताना ब्रश असा हातात धरावा ज्याने ब्रिस्टल हिरड्यांसोबत ४५ डिग्रीच्या कोनामध्ये राहतील. समोरीत दातांसाठी ब्रेश वर-खाली फिरवावा. तर मागे असलेल्या दातांसाठी ब्रश गोल फिरवावा. ब्रश करताना दातांचा आतील भागही स्वच्छ ठेवावा.
२-३ मिनिटांहून जास्तवेळ ब्रश करु नये तसंच ब्रश जोर लावून करु नये. ब्रशची निवड करताना ब्रिस्टल्स सॉफ्ट, नायलॉनचे व गोल टिप्सचे असावेत.
टूथपेस्टही शक्यतो सफेद किंवा फ्लोराईडयुक्त असावी जेणेकरुन दातांना कीड लागण्याची शक्यता कमी होते. पण जर घरात सहा वर्षांखालील मुले असतील तर फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट टाळावी.
दात घासत असताना जीभेचीदेखील स्वच्छता आवश्यक आहे. टूथब्रशच्या मागे असलेल्या खडबडीत भागाने किंवा बोटानेही हळुवारपणे जीभ घासता येते.