मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा मधुमेही रूग्णांना असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान काही अशी प्रकरणं देखील समोर आलेली आहेत ज्यामध्ये कोरोना झाल्यानंतर रूग्णांमध्ये ब्लड शुगर वाढलेली दिसून आली आहे. कोरोना आणि वाढलेली ब्लड शुगर रूग्णांसाठी केवळ धोकादायक नसून यामुळे ब्लॅक फंगसचा धोकाही वाढतो.
दरम्यान मधुमेही रूग्णांसाठी कोरोना धोकादायक ठरू शकतो. यासाठी डॉक्टर मधुमेही रूग्णांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकदा मधुमेही रूग्णांची ब्लड शुगर वाढते तर कधी घटताना दिसते. अशात रूग्णांच्या मनात प्रश्न येतो की जर ब्लड शुगर लेवल जास्त असेल तर अशावेळी लस घ्यावी का?
कोरोना लस इन्फेक्शनला शोधून शरीरात इम्युन सिस्टीमला सक्रि करतं. लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट दिसणं सामान्य आहे. मात्र लस कोरोनाप्रमाणे ब्लड शुगर वाढवण्याचं काम नाही करत.
दरम्यान एका वृत्तपत्राला माहिती देताना भोपाळच्या एम्सचे डायरेक्टर सरमन सिंह म्हणाले, हाय ब्लड शुगर असणारे रूग्ण देखील कोरोनाची लस घेऊ शकतात. कारण लस आणि ब्लड शुगरची पातळी यांच्यात कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. कोरोना लस आणि हाय ब्लड शुगर यांच्यात काहीही संबंध नसल्याने तज्ज्ञ लवकरात लवकर रूग्णांना लस घेण्याचा सल्ला देतात.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमची रक्तातील साखर अचानक वाढली तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. डॉ.सिंह यांच्या मते, "लसीचा शरीरातील साखरेच्या पातळीशी काहीही संबंध नाही. जर तुमची रक्तातील साखर जास्त असेल तर इंजेक्शन घेताला वेदना होऊ शकतात."