धक्कादायक! WHOच्या 21 कर्मचाऱ्यांकडून महिलांचं लैंगिक शोषण

जागतिक आरोग्य संघटनेच्या 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे

Updated: Oct 2, 2021, 12:05 PM IST
धक्कादायक! WHOच्या 21 कर्मचाऱ्यांकडून महिलांचं लैंगिक शोषण title=

कांगो : जागतिक आरोग्य संघटनेच्या 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 2018 ते 2020 या काळात आफ्रिकन देशात या घटना घडल्या असल्याचं स्वतंत्र तपासात उघड झालं आहे. डब्ल्यूएचओचे कर्मचारी इबोला साथीचा सामना करण्यासाठी कांगोला गेले, जेव्हा त्यांनी अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

WHO प्रमुखांनी काय सांगितलं

'न्यूयॉर्क टाईम्स'च्या अहवालानुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी स्वतंत्र समितीच्या चौकशीत कर्मचाऱ्यांवरील आरोपांची पुष्टी केल्यानंतर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. टेड्रोस म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा देणं हे प्राधान्यापेक्षा वर आहे. रुग्णालयात दाखल महिलांवर लैंगिक हिंसाचार असल्याचंही तपास पथकाला आढळलं.

असा घडायचा प्रकार

इबोला साथीच्या काळात महिलांचं लैंगिक शोषण करणारे सुमारे 83 लोकं सापडलेत. त्यापैकी 21 डब्ल्यूएचओचे कर्मचारी होते. पीडितांकडे मदतीसाठी गेलेले हे कर्मचारी महिलांना त्यांच्या पेयांमध्ये काही द्रव्यं टाकायचे आणि महिलांना त्यांच्या वासनेचा बळी करायचे. तर काही महिला नोकरीच्या आश्वासनांच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय.

50 महिलांनी आरोप केले होते

पीडित महिलांनी असंही सांगितलं की, लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी गर्भनिरोधक वापरले नाही आणि नंतर गर्भपातासाठी दबाव आणला. 

काही पीडित महिलांनी सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांना नोकरीचं आश्वासन देऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता. या घटनांचा तपास तेव्हा सुरू झाला जेव्हा सुमारे 50 महिलांनी त्यांना मदत करणाऱ्या लोकांवर गंभीर आरोप केले. तर इबोला साथीच्या वेळी, कांगोमध्ये सुमारे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला.