शक्तीमुद्रा - रोगप्रतिकारक्षमता सुधारणारा नैसर्गिक उपाय

ऋतूमानामध्ये बदल झाला की काहीजणांना हमखास त्रास होतो. आजकाल प्रदूषण, निर्सगामध्ये अचानक होणारे बदल, ग्लोबल वॉमिंग यामुळे ऋतूचक्रामध्ये बदल होतात. परिणामी सर्दी,पडसे, खोकला, ताप असे  लहान सहान वाटणारे अनेक आजार डोकं वर काढतात. 

Updated: Apr 22, 2018, 08:14 AM IST
शक्तीमुद्रा - रोगप्रतिकारक्षमता सुधारणारा नैसर्गिक उपाय  title=

मुंबई: ऋतूमानामध्ये बदल झाला की काहीजणांना हमखास त्रास होतो. आजकाल प्रदूषण, निर्सगामध्ये अचानक होणारे बदल, ग्लोबल वॉमिंग यामुळे ऋतूचक्रामध्ये बदल होतात. परिणामी सर्दी,पडसे, खोकला, ताप असे  लहान सहान वाटणारे अनेक आजार डोकं वर काढतात. 

लहान सहान वाटत असणार्‍या या समस्या उद्भवणं हे रोगप्रतिकारशक्ती कमी असण्याचं एक लक्षण आहे. मग नैसर्गिक आणि औषधपाण्याव्यतिरिक्त तुम्हांला शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर संतुलित आहार, योग्य व्यायाम किंवा योगसाधना करणं फायदेशीर ठरतं.  

मुद्रा अभ्यास -  

 आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना जीममध्ये जाऊन किंवा अगदी खास वेळ काढून व्यायाम करता येत नाही. मात्र अशा कारणांनी शरीराची हेळसांड करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच अगदी बसल्या जागी, प्रवासात किंवा टीव्ही बघता बघताही मुद्रा अभ्यास केला जाऊ शकतो.  

शक्ती मुद्रा -  

शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी 'शक्तिमुद्रा' फायदेशीर ठरते. अस्थमाच्या रूग्णांना, खेळाडूंना शक्तीमुद्रा फायदेशीर ठरते. शक्तिमुद्रेमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. शक्तिमुद्रेमुळे निद्रानाश, स्लिप डिस्क, पाठीचे दुखणे  कमी करण्यासही मदत होते. 

कशी कराल शक्तिमुद्रा -  

शक्तिमुद्रेसाठी तर्जनी आणि मधल्या बोटाखाली अंगठा प्रेस करा,करंगळी आणि त्याच्या बाजूला असलेल्या बोटाला सरळ रेषेत ठेवा. दोन्ही हातांच्या ही स्थिती समान ठेवून ती एकमेकांसमोर ठेवा. 
दिवसभरात ही मुद्रा किमान अर्धा तास करावी. सलग अर्धा तास वेळ नसल्यास दिवसभरात काही मिनिटांच्या अंतराने किमान 2-3 वेळेस ही मुद्रा केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतो. मुद्राभ्यास करताना दीर्घ श्वास घ्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास अधिक फायदेशीर ठरेल.