Sault Cause : मीठ किंवा सोडियम क्लोराइड एक आवश्यक पोषक तत्त्व शरीरासाठी आवश्यक आह. द्रव पदार्थांना रेगुलेट करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मीठ अत्यंत महत्त्वाचे असते. सोडियमचे जास्त सेवन पण हाडांना खिळखिळे करून टाकतात. लघवीच्या माध्यमातून सोडियम शरीराच्या बाहेर पडते. सोडियमचे सेवन शरीरामध्ये अधिक प्रमाणात झाले तर लघवीद्वारे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले जाते. यामुळे कॅल्शियमचे संतुलन देखील बिघडू शकतो. ज्यामुळे हाडांचे देखील नुकसान होते. हाय सोडियम फूडचे सेवन हाडांमधील मिनरल डेंसिटी कमी होते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका निर्माण होऊ शकतो. NCBI च्या रिपोर्टनुसार, मीठाचे प्रमाण अधिक असल्यास शरीरावर होतात काय परिणाम?
हाय सोडियम हाय ब्लड प्रेशरचे प्रमुख कारण आहे. ज्यामुळे हृदय रोग, स्ट्रोक सारखे हृदयाशीसंबंधित आजार बळावतात.
सोडियमच्या जास्त वापरामुळे किडनीवर दबाव पडतो. ज्यामुळे किडनी खराब होण्याची दाट शक्यता असते. किडनीचा त्रास जाणवत असेल तर मीठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
सोडियम शरीरात द्रव पदार्थ निर्माण करण्याचे कारण ठरते. यामुळे शरीराला सूज येणे आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवतात. वजन वाढण्याला जसे मीठ कारणीभूत आहे अगदी तसेच साखर देखील कारणीभूत ठरते. मीठामुळे शरीराला एक प्रकारचा जडपणा येतो.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे पोटाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. मीठ कॅन्सरचे कारण बनते. 268000 हून अधिक लोकांवर याचे संशोधन करण्यात आले. यामध्ये कळलं की, दररोज ३ ग्रॅमहून अधिक मीठाचे सेवन करणे शरीरासाठी घातक आहे. 68% लोकांना पोटाचा कॅन्सरचा धोका असतो.
अतिरिक्त सोडियमच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर, डायबिटिस आणि मुतखड्याचा त्रास जाणवतो. दररोज मीठाचे प्रमाण 2,300 मिलीग्रामहून कमी किंवा 1,500 मिलीग्राम पर्यंत सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे प्रोसेस्ड आणि पॅकेज फूड टाळणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. कारण यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. तसेच ताजी फळे, भाज्या यांच्यावर मीठ वरून घेऊन खाऊ नये.
हाडांना कमकुवत बनवण्यात मीठासोबतच साखर देखील घातक आहे. अभ्यासानुसार, साखरेचे अधिक सेवन शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळवून देत नाही. साखरेच्या जास्त सेवनान कॅल्शियम देखील कमी होते. यामुळे देखील हाडे दुखतात.